यवतमाळ मॉम्स तर्फे घेण्यात आलेल्या सावन महोत्सव कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
दिनांक 19 जुलै 2025 रोजी यवतमाळ मॉम्स क्लब चा पदग्रहण सोहळा खंडेलवाल ज्वेलर्स यांच्या हॉलमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये यवतमाळ मॉम्स क्लब 2025 – 2026 च्या नवीन बॉडी मेंबर्स चे स्वागत करण्यात आले . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सौ कीर्ती ताई राऊत, डॉक्टर अंजली गवारले मॅम आणि भक्ती दुधे यवतमाळ इन्फ्लुयेन्सर लाभले होते. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाच शुभारंभ झाला. सगळ्या पाहुण्यांचे सुंदर असे गुलाबाचे रोप देऊन स्वागत करण्यात आले.
तसेच खंडेलवाल ज्वेलर्स आणि यवतमाळ मॉम्स क्लब तर्फे सावन महोत्सवही घेण्यात आला. या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सुमारे 50 ते 60 महिला कार्यक्रमास उपस्थित होत्या. या कार्यक्रमात लकी लेडी प्रिया माकोडे, तीज क्वीन रसिका राऊत, मिसेस फॅशनस्टार सौम्या गोविंदानी, मिसेस नाईटइंगल खुशबू भंडारी, मिसेस प्रो डांसर सरिता टाके आणि बेस्ट हिना छाया चव्हाण असे अवॉर्ड देण्यात आले. तसेच या कार्यक्रमात विविध फन गेम सुद्धा घेण्यात आले. गब्बर बसंती म्युझिकल चेअर चे सीमा डहाके सरिता टाके विनर्स होते आणि टंग ट्विस्टर गेम चे विनर शामल जैन होत्या. तंबोला सुद्धा खेळण्यात आले. महिलांनी खूप एन्जॉय केलं.
यवतमाळ मॉम्स क्लबच्या नवीन कार्यकारिणीचे पदभार अध्यक्ष मोनिका भंडारी, उपाध्यक्ष शानू राठोड, सचिव भाग्यश्री नंदाने आणि टीमने स्वीकारले. क्लबच्या फाउंडर सौ.किशोरी उपलेंचीवार यांनी सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल सर्व टीमचे आणि खंडेलवाल ज्वेलर्स चे इव्हेंट मॅनेजर अनिकेत आसरकर सर यांचे आभार मानले. शानू राठोड यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.