शीतल सामाजिक महिला बहुउद्देशीय प्रशिक्षण संस्था आणि करिअर अकॅडमी’चे उद्घाटन

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘शीतल सामाजिक महिला बहुउद्देशीय प्रशिक्षण संस्था आणि करिअर अकॅडमी’ची स्थापना शितल ब्युटी झोनच्या संचालिका शितल खरे यांनी केले आहे.या संस्थेचा उद्घाटन सोहळा आज मंगळवार दि.१२ ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजता शितल ब्युटी झोन मैथिलीनगर वाघापूर लोहारा बायपास रोड यवतमाळ येथे कॉस्मेटोलॉजिस्ट फाउंडर एमडी इंदिरा इंडस्ट्रीज संचालिका जयश्री घाटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.
ही संस्था महिलांसाठी विविध प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण वर्ग सुरू करत आहे, ज्यात ब्युटी क्लासेस, शिवणकाम, बेसिक ते ॲडव्हान्स मेकअप क्लासेस, नेल आर्ट क्लासेस, व्यक्तिमत्व विकास (पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट) आणि योगा क्लासेस यांचा समावेश आहे. या प्रशिक्षणामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी मिळेल.
संस्थेच्या माध्यमातून महिलांना केवळ व्यावसायिक प्रशिक्षणच नाही, तर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शनही केले जाणार आहे. संस्थेच्या या उपक्रमाचे स्वागत होत असून, याप्रसंगी चंद्रकांत चव्हाण डॉक्टर गणेश सव्वा लाखे चेतन चव्हाण लैला रायानी मीना वानखेडे मनीषा डोंगरे प्राध्यापक सारिका मॅडम, बरखा मॅडम,अमीना वानखडे,फराहाना मॅडम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.