जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था म.ll संस्था व सभासद हीत लक्षात घेवुनच कार्य सुरू ! अध्यक्ष.. महेश सोनेकर

यवतमाळकॉटन सिटी न्यूज
यवतमाळ जिल्हा परिपद कर्मचारी सहकारी पतसंस्था म. यवतमाळ र.नं.१०९ मग्येचे व गभासदांचे सर्वोतोपरी हित जोपासण्याचे काम मागील तिन वर्षापासुन संचालक मंडळ करीत असुन शासकीय नियमानुसार आवश्यक त्या सर्व तरतुदी करूनच मात कोटी तेहतीस लाख रूपयाचा नफा संस्थेला झालेला आहे. त्यामुळे कोणताही ठोस पुरावा नसताना विनबुडाचे आरोप विरोधक करीत असल्याची माहीती संस्थेचे अध्यक्ष महेश सोनेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
मागील संचालक मंडळाने २०१८ ला मुकुटवन येथे झालेल्या आमसभेत ठराव घेऊन कर्मचारी नसलेल्या ठेवीदाराना संस्थेचे सामान्य सभासद वहाल केले होते. व गैर कर्मचा-यांना पतसंस्थेच्या संचालक मंडळावर निवडुन येण्याचा रस्ता मोकळा करून सम्येचे खाजगीकरण केले होते. या कारणामुळे संस्थेच्या सामान्य सभासदांनी मागील संचालक मंडळाला निवडणुकीमध्ये त्यांचा दारूण पराभव करून परिवर्तन चे एकविसही संचालक निवडुन दिले. निवडणुकीत आम्ही उपविधी दुरुस्त करण्याचा शब्द आम्ही सभासदाना दिला होता. त्यानुसार निवडुन आल्यावरोवर लगेच उपविधी मध्ये मेवानिवृत्तीनंतर संस्थेचे सभासद राहता येनार नाही अशी दुरूस्ती करून संस्थेचे खाजगीकरण होण्यापासुन रोखले आहे. शासनाने सुध्दा यास मान्यता दिली आहे. सत्तेत आल्यानंतर आम्ही तिन वर्षाच्या कालावधीमध्ये व-याच शिर्षकावर खर्चामध्ये काटकसर करून वचत केली आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्रातल्या बहुतांश पतमस्थेचा व्याजदर हा आपल्या पतसंस्थेच्या व्याजदरापेक्षा जास्त आहे. मागील संचालक मंडळाचे काळात संस्थेचा एनपीए हा जवळपाग २५ कोटीपर्यंत होता आणि त्यांनी निवडणुक काळात मयदिपेक्षा व नियमवाहय जास्त कर्ज वाटप केल्यानेच आज मम्थेचा एनपीए वाढलेला असुन त्यांनी नियमवाहय केलेल्या कर्ज वाटपाची चौकशी करून जवळपास १७७ सभासदाना सेवानिवृत्ती जवळ असताना सुध्दा नियमवाहय कर्ज वाटप केले असल्याचे उघडकीस आले आहे. सदर प्रकरणी मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, यवतमाळ यांचेकडे रितसर तकार केली असुन संस्थेचा एनपीए हा ४० कोटी आहे हे आरोप पुर्णतः खोटे आहे. तसेच मेवानिवृत्तीचे प्रमाण जास्त असल्यामुळे व जि.प. अंतर्गत नविन भरती नसल्यामुळे सभासद कमी झाल्यामुळे संस्थेचे भागभांडवल अंशतः कमी झाले असुन विरोधकांनी सभासद भाग भांडवल ६ कोटीनी कमी झाले असे म्हणने चुकीचे आहे. मागील संचालक मंडळाने २४ कोटीचे कर्ज थकीत केले होते त्यामुळे पतसंस्थेवर आर्थीक ताण निर्माण झाला असे असले तरी नविन संचालक मंडळाने दिलेल्या आश्वासनानुगार तारेवरची कसरत करून थकीत वसुलीकरीता प्रयत्न केले आहे. याउलट माजी अध्यक्ष व संचालक मंडळाने त्याच्या काळात एक टक्का व्याजदर लपुन-छपुन वाढवुन जवळपास एक वर्षापर्यंत सभासदांकडुन प्रचंड आर्थीक लुट केली होती. विरोधकाच्या ताब्यात असलेल्या १६५१ या पतसंस्थेचा व्याजदर कीती आहे हे त्यांनी छातीवर हात ठेवुन एकदा जिल्हयातील सर्व सभासदांना सांगावे. कुटुंबपमुख गेल्यानंतर कुटुंवाची जी हानी होते तिचा विचार करता पतसंस्थेने अपघात विम्याची रक्कम २० लाखावरून ३० लाख केली त्यामुळे साहजिकच प्रिमीयम वाढणे हे कमप्राप्त आहे. परंतु त्यामध्ये सुध्दा अधिकचा प्रिमीयम न लावता केवळ ९०० रूपयात तिम लायाचा विमा उतरविला आहे. त्याचप्रमाणे ठेवीदारांची मागणी लक्षात घेऊन ठेवीवरील व्याजदरात एक टक्याची वाढ केली असुन अधिकतम व्याजदर १० टक्कयापर्यंत आहे. संस्थेने १६७ कोटीची गुंतवणुक ईतर बँकेत केली असुन सभासदाच्या सोईसाठी कोनतेही बांधकाम न करता भाडे तत्वावर खोली भाडयाने घेऊन पांढरकवडा व आर्णी येथे शाखा सुरू केल्या अल्पखर्चात महकार भवन येथे कार्यालय व रंगरंगोटी करून सहकार भवनाचे उत्पन्नात वाढ केली. महाराष्ट्रातील सर्व प्रगत पतसंस्था आणि बँकानी लॉकर सुविधा निर्माण केली आहे. त्याच धर्तीवर आपण आपल्या संस्थेत लॉकर सुविधा निर्माण करून जवळपास ४०० ठेवीदारांना जोडण्याचे काम केले आहे. नविन सॅफ्टवेअर घेऊन सभासदांना मुलभुत सुविधा देण्याचा प्रयत्न संचालक मंडळाने केला आहे. त्याचप्रमाणे मंग्थेच्या मागासवर्गीय कर्मचा-यांना पदोन्नती देऊन त्यांना न्याय देण्याचे काम संचालक मंडळाने केले आहे.
मागील संचालक मंडळाचे काळातील कलम ९१ अंतर्गत दाखल प्रकरणापैकी जवळपास २४२ प्रकरणामध्ये वसुली केली तसेच एनपीए झालेल्या जुन्या प्रकरणात तडजोड करून युडीत असलेले कर्ज वसुल करून एनपीए कमी करण्याचा पयल केला आहे. संस्थेच्या थकीत कर्ज वसुलीकरीता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम अंतर्गत नमुद कलम ९१, १०१ तसेच १३८ अंतर्गत प्रकरण न्यायालयात दाखल करावे लागतात. यामध्ये कर्जाज्या रक्कमेनुसार कोर्ट फी, पोसेसींग फी, वकील फी आकारावी लागते व सदर ची रक्कम सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०७ (१४) मधील तरतुदीनुसार संबधित कर्जदारांच्या कर्ज खात्यावर नावे करून वसुल करावी लागते. सभासदांच्या भरवशावर पतसंस्था टिकुन आहे त्यांच्या आदारातिथ्यात आम्ही कुठेही तडजोड केली नाही. नियमात बसेल त्याला ज्या दिवशी अर्ज त्याच दिवशी कर्ज याचे आम्ही संघटना भेद न पाहता तंतोतंत पालन केले आहे.पतसस्था ही आपल्या सर्वाच्या पैशातुन उभी राहीली असल्यामुळे उधळपटटी करण्याचा विचारही आमच्या डोक्यात येत नाही संस्थेच्या ठेवी कमी होत आहे अशा खोटया वातम्या संस्थेचे मागील अध्यक्ष व त्यांचे निकटवर्तीय असलेले आसाराम चव्हाण हे जाणीवपुर्वक ठेवीदारांना फोन करून, सोशल मिडीयावर तसेच वृत्तपत्रातुन बातमी देऊन संस्थेची वदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहे. आज रोजी संस्थेच्या ठेवीत भक्कम अशी वाढ झालेली असुन दररोज ठेवीचा ओघ वाढतच आहे आणि संस्थेतील सर्व ठेवी हया वास्तविक असुन सर्व ठेवीच्या नोंदी संस्थेमध्ये उपलब्ध असुन आज रोजी संस्थेकडे ३३७ कोटीच्या ठेवी असुन १६७ कोटीची गुतवणुक आहे. त्यामुळे ठेवीदारांनी कोणत्याही प्रकारची चिंता करू नये संस्थेमधील आपल्या ठेवी अगदी सुरक्षित असुन खोटया आश्वासनाला बळी न पडण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष महेश सानेकर, उपाध्यक्ष संजय गावंडे, सचिव संजय विहाडे यानी केले आहे. सदर पत्रकार परिपदेला संचालक पोपेश्वर भोयर, शरद घारोड, मुकेश भोयर, विनोदकुमार कदम, अशोक चटप, प्रदिप मोहटे, गजानन पोयाम, तुपार आत्राम, नदिम पटेल, अभिजीत ठाकरे, स्वप्नील फुलमाळी, विलास टोंगे, सचिन ठाकरे, तेजस तिवारी, सुनिता गुधाणे, विजया राऊत व सरव्यवस्थापक मारोती राजगडकर उपस्थित होते.