काळा रंग समर्पणाचे प्रतीक आहे मोरारी बापू : चौथ्या दिवशी सांगितली रामजन्माची कथा

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
काळा रंग ग्रहण करणारा असतो. जो काळेपणा स्वीकारतो, तो प्रकाशही स्वीकारतो. देवी दुर्गेच्या नऊ रूपांमध्ये माता काली प्रमुख असून ती काळी आहे. गाय काळी परंतु दूध पांढरे आहे. रंग काळा पण आतमध्ये शुभ्र पांढरा श्वेत उज्ज्वल आहे. म्हणूनच काळा रंग समर्पणाचे प्रतीक आहे, असे प्रख्यात कथाकार मोरारी बापू यांनी सांगितले.
येथील दारव्हा रोडवरील चिंतामणी बाजार समितीत आयोजित रामकथा पर्वात मंगळवारी चौथ्या दिवशी मोरारी बापू यांनी राम जन्माचा प्रसंग सांगितला. ते म्हणाले, काळ्या रंगाचा महिमा मोठा आहे. दशावतारात राम, कृष्णाचा रंग सावळा मानला जातो. काळेपण म्हणजे खोलीचे (गहराई) प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष म्हणजे हनुमान आहे. हनुमान चालिसा म्हणू नका, तर स्वत:ला शुद्ध करण्यासाठी तो म्हणा. हनुमान चालिसामध्ये हनुमान शब्द केवळ चारवेळा आला आहे आणि हनुमान या शब्दात अक्षरेही चारच असल्याचे त्यांनी सांगितले. रामकथेप्रसंगी एका भाविकाने हनुमान चालिसा १०८ वेळा म्हटली पाहिजे का, असा प्रश्न केला. यावर मोरारी बापू यांनी यावर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष म्हणजे हनुमान आहे, असे ते म्हणाले.
‘मोहब्बत में तो ऐसा नही होता’
रामकथा पर्वाचे यजमान डाॅ. विजय दर्डा यांनी मला तर बापूंसोबत मोहब्बत झाल्याचे सांगत प्रसिद्ध शायर शहरयार यांचा शेर सांगितला. ते म्हणाले, ‘मोहब्बत में तो ऐसा नही होता, मै खुद से जुदा होकर भी तन्हा नही होता’. सोमवारी बापूंनी अग्नीबाबत सांगितले. अग्नीचे विशेष महत्त्व त्यांनी पटवून दिले. बापूंनी सांगितलेले सुफियानी विचार सर्वांसाठी मार्गदर्शक असल्याचे डाॅ. दर्डा म्हणाल
मान्यवरांची उपस्थिती
रामकथा पर्वाच्या चौथ्या दिवशी अखिल भारतीय चतु:संप्रदायाचे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा, माजी खासदार नवनीत राणा, माजी खासदार रामदास तडस, माजी मंत्री महादेव जानकर, जळगावचे माजी महापौर रमेशदादा जैन, माजी आमदार विजयाताई धोटे, कांतिलालजी काेठारी, निर्मलाजी कांतिलाल काेठारी, रेखाजी सुशीलकुमारजी जालान, आशीषबाबू जालान, धीरेनभाई शहा, निरूबेन शहा सर्व रा. मुंबई, नीताजी गांधी रा. अहमदनगर, ज्येष्ठ पत्रकार विलास मराठे (अमरावती), सत्यनारायणजी नुवाल, शैलश लुख्खी, जलपा शैलश लुख्खी, मावजीभाई पटेल (मुंबई), राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहप्रांत संचालक परिक्षित जावडे, दत्तराम नंदापुरे गुरुजी, जिल्हाधिकारी विकास मीना, पोलिस अधीक्षक कुमार चिंता, दिव्या कुमार चिंता आदी उपस्थित होते.