ताज्या घडामोडी
५ ऑगष्ट रोजी सिनियर पिरॅमिड मास्टर ज्ञानेश्वर राव यांचे उर्जेमध्ये १२ तास ध्यान

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
दि. ५ ऑगस्ट २०२५ रोजी संत योगीराज पिरॅमिड मेडिटेशन सेटर हैद्राबाद चे संचालक गजानन महाराज मंदीर विश्वास नगर वडगाव येथे सकाळी8 ते रात्री 8 पर्यंत संचालक अखंड ध्यानी ज्ञानेश्वर राव हे एकाच जागेवर बसुन न उठता आनी काही न खाता पिता उर्जेमध्ये १२ तास ध्यान करणार आहेत आजपर्यंत त्यांनी १ लाखापेक्षाही जास्त तास ध्यान केले आहे.या अखंड ध्यान शिबीराला प्रवेश निशुल्क आहेत तेव्हा यवतमाळ करांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजिका पुनम शेंडे संगीता टिप्रमवार यांनी केले आहेत