यवतमाळात स्त्रीमुक्ती परिषदेचे 5 ऑक्टोबर रोजी आयोजन

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
महाराष्ट्रातील स्त्री चळवळीला यंदा पन्नास वर्षे पूर्ण होत असून या पार्श्वभूमीवर नव्या पिढीसोबत संवाद साधण्यासाठी व चळवळीला नव्याने दिशा देण्यासाठी यवतमाळ येथे स्त्रीमुक्ती परिषद आयोजित करण्यात आली असल्याची माहिती मृणाली बिहाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली
या परिषदेत मा. प्रा. वर्षा निकम, मा. डॉ. आशा देशमुख, मा. प्रमोदिनी रामटेके, मा. ऍड. जीवन पाटील आणि मा. समीना शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच मा. यामिनी चौधरीस्त्री चळवळीचा इतिहास मा. अरुणा सबाने भारतीय संविधान व आमलबजावणी मा. शुभदा देशमुख हिंसेची विविध ता आणि मा. नूतन माळवी भारतीय संविधान स्त्रियांचं वास्तव्य या मान्यवर वक्त्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत.
या परिषदेसाठी पुढाकार घेणाऱ्यांमध्ये मृणाल बिहाडे, विद्या खडसे, ऍड. सीमा तेलंगे, विना गोतमारे व स्वाती दरणे माया गोबरे माधुरी खडसे श्रद्धा चौधारी सीमा सातपुते यांचा समावेश आहे.