स्वतंत्र महामंडळाच्या माध्यमातून जैन समाजाचा सर्वांगीण विकास..ना.ललित गांधी

यवतमाळ कॉटन सिटीन्यूज
जैन धर्म आणि जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय झाला असून या निर्णयाच्या माध्यमातून जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ निर्माण करण्यात आले आहे या महामंडळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना समाजासाठी राबविल्या जात आहे जैन समाज हा सरकारच्या नजरेमध्ये अति श्रीमंत असा समाज वर्तविल्या गेला आहे असे असले तरी या समाजामध्ये 30 टक्के कुटुंब अजूनही दारिद्र रेषेखालील आहे ते आजही छोटी छोटी व्यवसाय, आणि नोकरदार म्हणून काम करीत असल्याची माहिती देखील त्यांनी पत्रकार परिषदेत दिली
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय दालनामध्ये अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाचे तसेच जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्दे विशद केले देशामध्ये राज्य सरकारने या समाजासाठी पहिले पाऊल टाकले असून त्यासाठी 50 कोटी पेक्षा अधिक निधीची तरतूद केली आहे या अंतर्गत महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण, थेट कर्ज योजना, गृह कर्ज व्याज परतावा, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, बीज भांडवल योजना, आणि शैक्षणिक कर्ज उपलब्ध केल्या गेले, देश आणि विदेशात शिक्षण घेण्यासाठी अतिशय अल्प व्याज दरावर शैक्षणिक कर्ज जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले
या महामंडळाचे उद्देश आणि कार्य सांगताना समाजातील आर्थिक दुर्बल घटकात असणाऱ्या व्यक्तींचे कल्याण आणि विकासासाठी काम करणे, स्वयं रोजगारा करिता वेगवेगळे प्रशिक्षण देणे आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पत साधने साधनसामग्री आणि तांत्रिक व व्यवस्थापकीय साधने पुरविणे आवश्यक ते साहित्य सामग्री निर्मिती जुळवणी आणि पुरवठा अशा सेवा देणे, अति प्राचीन ग्रंथांचे संरक्षण संवर्धन आणि पुनर्लेखन करणे कायम पायी विहार करणाऱ्या जैन साधुसंतांच्या विहार साठी सुरक्षा यंत्रणा उभी करणे तसेच विधवा आणि परि तक्त्या महिलांसाठी विशेष योजना कार्यान्वित करणे हा उद्देश असल्याने या उद्देशाला सफल करण्याचा कार्यक्रम हा अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.