जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय ‘बेस्ट अकॅडेमीक इंस्टीट्यूट इन द विदर्भ रिजन’ ने सन्मानित

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या संस्थांना महाराष्ट्र कॉर्परिट एक्सलन्स अवार्ड व महाराष्ट्र एज्युकेशन आयकॉन अवार्ड २०२५ तसेच जांविझा तर्फे सन्मानित केले. जगदंबा इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या प्रगतशिल कार्याची पावती म्हणुन पुण्याचे नामांकीत हतिल सन्नी’ज वर्ल्ड येथे बेस्ट अकॅडेमीक इंस्टीटयूट इन द विदर्भ रिजन ने चंद्रकांत दादा पाटील उच्च आणि तत्रंशिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी कार्यकमाचे मुख्य अतिथि म्हणून चंद्रकांत दादा पाटील उच्च आणि तत्रशिक्षण मा. मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते संस्थेचे सचिव डॉ. शितल वातीले व डॉ. सुमित राऊत यांनी हा पुरस्कार स्विकारला. याप्रसंगी डॉ. पराग काळकर, उपकुलगुरू, सावित्रीबाई फुले विद्यापिठ पुणे, डॉ. नितीन करमाळकर, माजी कुलगुरू, सावित्रीबाई फुले विद्यापिठ पुणे, डॉ. विश्वास गायकवाड प्राचार्य व माजी संचालक बोर्ड ऑफ कॉलेज अॅन्ड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट, डॉ. पंडीत विद्यासागर, उपकुलगुरू स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापिठ, जांबिझा मल्टिपल सर्व्हिसेस चे संस्थापक व कार्यक्रमाचे आयोजक गौरव शर्मा उपस्थीत होते.
महाराष्ट्र एज्युकेशन थिंक टॅन्क ही पुणे स्थापित ऑरगनायजेशन असून शैक्षणिक क्षेत्रामध्ये सर्वोत्तम कार्य करणाऱ्या संस्थांना व व्यावसाईक क्षेत्रातील नामांकित कंपण्यांना त्यांच्या कार्याचे विश्लेषन करुन जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करते व संन्मानित केल्या जाते महाराष्ट्रातून विविध महाविद्यालयांनी पुरस्काराकरिता आवेदन सादर केले होते. त्यापैकी जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालया सोबत इतर ११ शैक्षणीक संस्थांची पुरस्काराकरिता अंतीम निवड करण्यात आली. यावेळी कठोर निकश पडताळण्यात आले असून सदर पुरस्काराकरिता निवड प्रकिया ही अत्यंत कठिण स्वरुपाची होती.
त्यामध्ये विद्यार्थ्यार्थ्यांच्या विकासाकरिता आवश्यक सुविधांची उपलब्धता, प्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रमाण, स्वायत्त दर्जा, नॅकचे A+ अॅकिडिटेशन, महाविद्यालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सुविधा, महाविद्यालयीन प्राध्यापक वृंद, विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या नोकरीच्या संधी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख, स्पर्धेतिल इतर महाविद्यालया सोबतची चाचपणी व इंतर सुविधांचे अत्यंत काटेकोरपणे मुल्यमापण करण्यात आले.
या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यामुळे अभियांत्रिकीचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे महाविद्यालय म्हणून जगदंबा इंजिनिअरिंग महाविद्यालयास नाव लौकिक प्राप्त झाला. यावेळी सचिव डॉ. शितल वातीले, डॉ. सुमित राऊत, संचालक डॉ. आशिष लांबट व डॉ. सुशिल कपुर उपस्थित होते.
महाविद्यालयाचे व्यवस्थापकीय मंडळ, प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांचे एकत्रित प्रयत्न व परिश्रम यामुळे अत्यंत कमी वेळात महाविद्यालयाने सर्व स्तरावर नेत्रदिपक प्रगती केली आहे. मागील दहा वर्षातील प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रथम पसंती म्हणुन जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय हेच नाव पुढे आलेले आहे.
महाविद्यालयास बेस्ट अॅकॅडेमीक इंस्टीट्यूट इन द विदर्भ रिजनh मिळण्याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण डाखोले, उपप्रचार्य डॉ. विजय भांबेरे विविध विभाग प्रमुख, प्राध्यापक वृंद यांनी अथक परिश्रम घेतले.