गोसेवा सदनच्या पवित्र कार्यात विनायक दातेचा नाहक अडथळा

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
अत्यंत पवित्र उद्देश्याने गोसेवेच्या सुरू असलेल्या कार्यात, विनायक दाते या इसमाने स्वार्थापोटी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न चालऊन, गोसेवेसारख्या धार्मिक प्रकल्पाला नाहक बदनाम करण्याचा उपदव्याप, तथाकथित आणि कुबुध्दीवादी हिन्दू “दाते “वर करोडोच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल करून, त्याचा स्वार्थी आणि नकली मुखौटा समोर आणण्याचे आम्ही गो-सेवकांनी ठरविले आहे. एकीकडे गोवंशीय पशूची सर्रास कत्तलीसाठी होणा-या निर्यातितील गायी-वासरांसह निराधार गार्गीचे संगोपन करण्याचे पवित्र कार्य अनेक दानशूरांच्या सर्वतोपरी मदतीने, ” विशुद्ध गोसेवा सदन “च्या माध्यमातून तब्बल १३ वर्षापासून आम्ही करीत आहोत. सन. १९९२ मध्ये गोधनी येथील शेत सव्र्व्हे क्र. १४/१/अ मधील दोन एकर जमीन खेमचंद दयालजी खंदेडीया यांनी विशुद्ध विद्यालयाच्या नावे बक्षीस पत्राव्दारा गोरक्षण (गोशाळा) आणि वनीकरणासाठी दान दिली आहे. ती जमीन निरूपयोगी पडीत असल्याने, आम्ही धार्मिक वृत्तीच्या अनेकांनी एकत्र येऊन, सर्व नियमांची पुर्तता करीत ” सन. २०१२ मध्ये विशुद्ध गोसेवा सदन” ची स्थापना केली. आणि २०१३ मध्ये सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात रजिस्ट्रेशन केले. त्याचा रजिस्ट्रेशन क्रमांक ई-३३५ एफ असा आहे. गोसेवा सदनच्या स्थापनेसोबतच उपरोक्त जमीनीवर अधिकृतरित्या भूमिपूजन करण्यात आले. त्या कार्यक्रमाला विशुद्ध विद्यालय संस्थेचे तेव्हाचे सचिव व विशुद्ध गोसेवा सदनचे विद्यमान अध्यक्ष सुरेश शिंदे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर प्रमुख्याने उपस्थित होते. तेव्हापासून गोसेवा सदनमध्ये आतापर्यंत १६८ गायी-वासरांचे पालन-पोषण नियमित सुरु आहे. विशुद्ध गोसेवा सदन च्या संचालकांनी स्वखर्चासह अनेक दानशूरांच्या मदतीने, गोसेवा अव्याहत सुरू ठेवली आहे. अनेक दानशूर मान्यवर गायी-वासरांसाठी सर्वप्रकारचा चारा व आवश्यक वस्तूंच्या माध्यमातून मदत करीत आहेत. हा नित्यक्रम तब्बल ओ१२-१३ वर्षापासून सरू आहेत. व गोसेवा सदन माध्ये १६८ गायी-वासरांची संख्या असताना, आता कुठे सरकारकडून एका गायीमागे ५० रूपयाप्रमाणे, फक्त ६० गार्गीसाठी अनुदान मिळाले आहे. त्या अनुदानित रक्कमेवर आणि सदर जमिनीच्या प्रचंड मोठ्याप्रमाणात वाढलेल्या किंमतीवर लक्ष केंद्रीत करून आथिर्क लाभ प्राप्त करण्याच्या उद्देश्याने दाते यांच्या नीयतीत स्वार्थ जडल्याने, विनायक दाते यांनी विशुद्ध गोसेवा सदनच्या चालकांवर आथिर्क गैरव्यवहाराचे खोटे आरोप केले आहेत. त्या आरोपात मुळीच तथ्य नसून, दाते विरुद्ध संचालक मंडळ मानहानीचा दावा दाखल करणार आहे. विनायक दाते यांच्या विद्यमान कार्यकाळात विशुद्ध विद्यालय शिक्षण संस्थेत सुध्दा अनेक प्रकारच्या अनियमितता समोर येत आहेत.अशी माहिती पत्रकार परिषद मध्ये अशोक कोठारी. मनोज जमणालाल अटारा महेंद्र दावडा गणेश गुप्ता महेंद्र महाजन प्रफुल्ल खान्देडीया
ब्रिजमोहन चांडक संतोष हरनखेडे चरण वाळके राजू खंडाळकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते