शितल मेकअप झोन यवतमाळ तर्फे स्किन प्रोटेक्टेड तसेच हेअर मेकअप चे सेमिनार संपन्न

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
यवतमाळ येथील सुप्रसिद्ध ब्युटीशियन व कॉस्मोलॉजिस्ट शितल खरे फरह खान यांच्या अथक प्रयत्नातून आज दिनांक 16 जुलै रोजी स्थानिक उत्सव मंगल कार्यालय यवतमाळ येथे सकाळी बारा वाजता पासून सायंकाळी पाच वाजता पर्यंत स्किन प्रोटेक्टेड हेअर मेकअप प्रशिक्षण सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या सेमिनारसाठी सीईओ आणि फाउंडर ऑफ इंदिरा इंडस्ट्रीजच्या संचालिका व लेझर आर्टिस्ट सौ जयश्री सुनील घाटे इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट व फिल्म इंडस्ट्रीज मेकअप आर्टिस्ट गुजरात अनुपमा परमार आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. सेमिनारच्या उद्घाटनाप्रसंगी महावीर युथ फाऊंडेशन तसेच सखी समर्पणचे मार्गदर्शक विजयकुमार बुंदेला आवर्जून उपस्थित होते. याप्रसंगी डॉक्टर गणेश सव्वालाखे यांनी युवती कौशल्यावर व स्वयंरोजगारावर अनमोल असे मार्गदर्शन केले.या शिबिरामध्ये जवळपास 250 प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे संचालन शितल मेकअप झोन मैथिली नगर च्या संचालिका शितल खरे यांनी केले