सहकार सप्ताह निमित्त जयंत भिसे नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे वृक्षारोपण
जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांची उपस्थितीत

यवतमाळकॉटन सिटी न्यूज
सहकार क्षेत्रात अग्रेसर जयंत भिसे नागरी सहकारी पतसंस्था यवतमाळ च्या वतीने सहकार सप्ताह निमित्त 6 जुलै रोजी दीनदयाल उपाध्याय स्मारक जांबरोड यवतमाळ येथे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, गुजर साहेब, कडूजी नगराळेसर जयंत भिसे पतसंस्थेचे अध्यक्ष अरुण भिसे, उपाध्यक्ष प्रदीप बनगिनवार,आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दिनदयाल स्मारक रस्त्यालगत वृक्षारोपण करण्यात आले
या प्रसंगी या परिसरात मॉर्निंग वॉक करणाऱ्यांनी वृक्ष संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारली जयंत भिसे नागरी सहकारी पतसंस्थेने
सहकार सप्ताह निमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करून स्तुत्य उपक्रम राबविला त्याची जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी मुक्त कंठाने प्रशंसा केली याप्रसंगी आशिष भिसे, सरव्यवस्थापक श्रीकांत अगस्ती, व्यवस्थापक पंकज उदार सुषमा बुरडे, निखिल बोनगिनवार कर्मचारी विनोद कंटाळे सतीश राजपूत व इतर कर्मचारी व गुरुमाऊली मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष पाटील साहेब,अजय संत,राऊत साहेब, रावसाहेब जवादे, गजानन धावतोडे इत्यादी हजर होते.