माऊली मंचतर्फे महिला सक्ष्मीकरण अंतर्गत एक दिवसीय शिबीर

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
माऊली फॉउंडेशन द्वारा संचालित माऊली मंचातर्फे महिलांसाठी एक दिवसाचे प्रशिक्षण शिबीर दिनांक 05/07/2025 रोजी संताजी भवन येथे घेण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणा पासून करण्यात आली. त्या नंतर स्त्री रोग तज्ञ डॉ. वृषाली माने मॅडम तर्फे महिलांना विविध आजरांवर मार्गदर्शन व त्यावर घेण्यात येणारी काळजी व उपाय याबद्दल मार्गदर्शन केले..
डॉ. स्वाती पाटील बालरोग तज्ञ यांनी सुद्धा स्त्रियांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर स्त्रियांनी आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा हेतूने माऊली मंचतर्फे ब्युटीपार्लर प्रशिक्षण देण्यात आले यात शीतल मेकओव्हरच्या संचालिका शीतल टाके यांनी प्रशिक्षण दिले.. इंनर व्हील तर्फे महिलांचे मोफत HB टेस्ट करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सौं. कल्पना बाळासाहेब मांगूळकर, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. वृषाली माने, डॉ स्वाती पाटील, माऊली फाऊंडेशनच्या सचिव श्रीमती. मालती नावडे, उपाध्यक्ष सौं. सुजाता जिद्देवार, माऊली मंच कार्याध्यक्ष सौं. नितीशा खासरे होत्या. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन दीपा झिलपे यांनी केले तसेच धनश्री चिकटे, प्रिया काळे, श्रुती ठोके, प्रियांका शिरभाते, प्रणाली कहाते, शीतल तायडे, स्नेहा दुधे व माऊली फॉउंडेशनचे इतर सदस्यांचे सहकार्य लाभले. माऊली फॉउंडेशनचे अध्यक्ष श्री. जितेश नावडे यांनी महिलांसाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मान्यवरांनी त्यांचे आभार मानले.