दै अमरावती दर्शन पुरस्कृत सखी समर्पण यवतमाळ चा प्रेरणादायी उपक्रम कॅन्सर ग्रस्तांसाठी केस दान

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
दैनिक अमरावती दर्शन द्वारा सखी समर्पण यवतमाळ च्या वतीने आज दिनांक एक मे कामगार दिनानिमित्त केस दान उपक्रम राबविण्यात आला.
हेअर फॉर होप त्रिवेंद्रम केरला संस्था 2010 पासून कॅन्सर पेशंट रुग्णांना हेअर विंग्स बनवून विनामूल्य देतात त्याच्या सहकार्य ने या उपक्रमाकरिता सखी समर्पण यवतमाळ याद्वारे गुगल मीट घेण्यात आली व यामध्ये केस दाना ची प्रेरणा घेऊन डॉक्टर पूजा सांगळे यांनी पुढाकार घेऊन केस दानाचा सकल्प घेतला प्रेरणेतून तीन महिलांनी कॅन्सर रुग्णांसाठी वीग उपलब्ध व्हावे याकरिता आज हेअर डोनेशन केले यामध्ये दैनिक अमरावती दर्शन द्वारा सखी समर्पणच्या मार्गदर्शिका श्रीमती रेखा जगताप, सखी समर्पणच्या भूतपूर्व अध्यक्ष साक्षी अंबलकर, व प्रकल्प अधिकारी डॉ पूजा सांगळे यांनी केस दान केले. सखी समर्पण यवतमाळच्या वतीने सर्वप्रथम यवतमाळ मध्ये हा अद्भुत कार्यक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आला व या माध्यमातून . विवेक सिसोदिया यांनी या मध्ये हेअर डोनेशन केल्यानंतर काय प्रक्रिया असते व त्याचा पुनर्वापर कसा केला जातो याची माहिती दिली. कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी केसदान करण्याची मोहीम महाराष्ट्रात विविध ठिकाणी सुरू आहे. अनेक संस्था आणि कामात सक्रिय आहेत. या मोहिमेतून गोळा केलेले केस विग बनवण्यासाठी वापरले जातात, ज्यामुळे कॅन्सरग्रस्त महिलांना मानसिक आधार मिळतो.
या मोहिमेतून, कॅन्सरग्रस्त महिलांना सुंदर दिसण्यासाठी विग मिळतो, ज्यामुळे त्यांना मानसिक आधार मिळतो आणि त्या आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतात. सध्याच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार निर्माण होत आहेत. त्यात एक गंभीर आजार म्हणजे कॅन्सर आहे. यामध्ये डोक्यावरचेच नाही तर अंगावरचे केसही गळतात. आजाराने शरीर पोखरत असतानाच डोक्यावरचे झडणारे केस आत्मविश्वास कमी करत जातात. मनही पोखरतात. काहींच्या मनात फक्त त्या गळलेल्या केसांमुळे आत्महत्येचा विचारही येतो. खरंच, काय मानसिक स्थिती होत असेल हातात येणारे केस पाहुन.
या सर्वातून आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो ह्या भावनेतून या महिलांनी आपले केस दान करून एक समाज जागृतीस मदत केली आहे. म्हणून महिलांनी जागृत होऊन आशा समाज उपयोगी उपक्रमात सहभाग घ्यावा असे आव्हान दैनिक अमरावती दर्शन द्वारा सखी समर्पण यवतमाळ ने व्यक्त केली. यवतमाळ मध्ये हा पहिला उपक्रम कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी हेअर डोनेशन करण्यात आले दैनिक अमरावती दर्शनचे आवृत्ती प्रमुख विजय कुमार बुंदेला तसेच दैनिक अमरावती दर्शन द्वारा सखी समर्पण यवतमाळच्या अध्यक्ष डॉ. कल्पना कूलारे सचिव सानिका यंबरवार मार्गदर्शिका रेखा जगताप संयोजिका दुर्गा मिश्रा साक्षी अंबलकर एडवोकेट पंकज ओसवाल इत्यादींनी सहभाग व उपस्थिती दर्शविले. सचिव सानिका यमबरवार यांनी सर्वांचे आभार मानून हा सुंदर उपक्रम हा राबवल्यामुळे सर्व टीम ला सदिच्छा दिल्या. सर्वांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाला.