विकासाचे महामेरू माजी खासदार विजय दर्डा यांचा वाढदिवस निलोना वृद्धाश्रमात साजरा

यवतमाळ कॉटन सिटीन्यूज
यवतमाळ जिल्ह्याच्या विकासाचे महामेरू लोकमत समूहाचे चेअरमन माजी खासदार विजयबाबू दर्डा यांचा 75 वा वाढदिवस सांस्कृतिक संवर्धक मंडळ द्वारा संचालित निळोणा येथील मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना जीवनात आवश्यक वस्तूंचे किट व स्नेहभोजनाने संपन्न झाला.
प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कीर्ती बाबू गांधी विशेष अतिथी म्हणून आमदार बाळासाहेब मांगुळकर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील लोकमत समूहाचे जिल्हाप्रमुख किशोर बाबू दर्डा विद्या प्रसारक मंडळाचे सचिव एडवोकेट प्रकाश चोपडा माजी नगरसेवक सुजित राय संस्कृत संस्कृतिक संवर्धक मंडळाचे संचालक अभय चोपडे आनंद भाऊ गावंडे कार्यक्रमाचे आयोजक श्रद्धेय जवाहरलाल दर्डा विचार मंच मंचचे प्रमुख माजी नगरपरिषद उपाध्यक्ष अशोक मुराब मनोज रायचुरा.विजय कुमार बुंदेला आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष कीर्ती बाबू गांधी म्हणाले की वृद्धाश्रमात वृद्धांची संख्या कमी व्हावी व दिवसेंदिवस वृद्धाश्रमात वृद्धांची सेवा करण्याची संधी न लाभो अशी प्रार्थना त्यांनी करून जिल्ह्याच्या विकासात दर्डा परिवारांच्या योगदानाबद्दल त्यांनी माहिती देऊन विजय दर्डा यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या बद्दल याप्रसंगी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील यांनी दर्डा परिवार व पाटील परिवारातील जुन्या स्मृतींना उजाळा देऊन विकास कामांमध्ये दर्डा परिवार सदैव अग्रेसर असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
याप्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक नामदेवराव दोनाडकर चंद्रकांत दोनाडकर शिरीष दोनाडकर हिरा मिश्रा.सुभाष यादव सुनील यादव संतोष बोरले जाकीरभाई बबली भाई आरिफ खान जाफर खान दीपक ठाकूर रामेश्वर यादव आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विजयकुमार बुंदेला यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजक मनोज रायचूरा यांनी केले