१६ मार्चला यवतमाळात भारत मुक्ती मोर्चाची रॅली

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
“मूलनिवासी बहुजन समाज जोडो यात्रा” या अभियाना अंतर्गत –भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा या संघटनांच्या वतीने ईव्हीएम मशीनच्या विरोधात तथा पेपर बॅलेटच्या समर्थनामध्ये, केंद्र सरकारने ओबीसीची जातवार जनगणना न केल्याच्या विरोधात, आर एस एस ,बीजेपी द्वारे मूलनिवासी बहुजन महापुरुषाच्या होत असलेल्या अवमानाच्या विरोधात , महाबोधी विहार( बोधगया बिहार)ब्राह्मण महंताच्या कब्जातून मुक्त करण्यासाठी 9 एप्रिलला राष्ट्रव्यापीजेलभरो आंदोलन होत आहे. या तयारीसाठी यवतमाळमध्ये भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेत 16 मार्च रविवारला रॅली होत आहे. ही रॅली बस स्टँड चौक -मार्गे -दर्डा नगर -माऊली मंगल कार्यालय दारवा रोड ने दुपारी 1.00 वाजता जाणार आहे.
या सभेला भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. वामन मेश्राम मार्गदर्शन करणार आहे. या सभेचे उद्घाटन मा.प्रदीप वादाफडे (विदर्भ अध्यक्ष ओबीसी आरक्षण परिषद) हे करणार आहे. तसेच प्रमुख अतिथी ऍड इमरान देशमुख (सामाजिक कार्यकर्ता), किशोर चव्हाण( जिल्हाध्यक्ष गोरसेना यवतमाळ), बिपिन चौधरी( जिल्हाप्रमुख कुणबी मराठा समाज संघटना), डॉ. सुभाष डोंगरे (सामाजिक कार्यकर्ता), जियाउद्दीन साहब ( अध्यक्ष जमाते इस्लाम यवतमाळ) ज्ञानेश्वर पाटील ( सामाजिक कार्यकर्ता), सुनील गवई जिल्हाध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा, गुलाब कन्नलवार राष्ट्रीय ओबीसी मोर्चा विजय चहांडे (संयोजक बहुजन क्रांती मोर्चा) सुनील वेले (संयोजक बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क यवतमाळ), विजयराज सेगेकर, ज्ञानेश्वर गायकवाड, किशोर नगारे, सुरज खोब्रागडे ,,गणपतराव गव्हाळे,तिलक नाईक इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ही जिल्हास्तरीय रॅली असल्यामुळे यवतमाळ सर्व तालुक्यातील भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद , बुद्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क ,छत्रपती क्रांती सेना ,मौर्य क्रांती संघ, भारतीय बेरोजगार मोर्चा, भारतीय विद्यार्थी मोर्चा इत्यादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती प्रसारमाध्यमाशी बोलताना भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील गवई यांनी दिली. या पत्रकार परिषदेला रामकृष्ण कोडापे (राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद) बिमोद मुधाने (बहुजन मुक्ती पार्टी)विजय चहांदे (जिल्हा संयोजक बहुजन क्रांती मोर्चा), विलास भोयर (भारत मुक्ती मोर्चा) राजीव डफाडे भारत मुक्ती मोर्चा संघटक इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.