माऊली नागरी सहकारी पतसंस्थेचा स्व वास्तू मध्ये प्रवेश सोहळा

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
असंख्य ग्राहकांच्या विश्वासाने व कृपेने माऊली नागरी सहकारी पतसंस्थेने आपली यशस्वी वाटचाल करीत आपल्या स्ववास्तूत दिनांक 14/12/2024 रोजी प्रवेश केला. या प्रसंगी बालयोगी संत श्री. विष्णू माऊली, यवतमाळ विधानसभेचे आमदार मा. श्री. बाळासाहेब मांगुळकर, माजी शिक्षणमंत्री मा. वसंतराव पुरके सर, चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष श्री. अरुण भाऊ पोबारू, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष श्री. राहुल ठाकरे,श्री. राजेंद्र गायकवाड, माजी नगराध्यक्ष श्री. बाळासाहेब चौधरी, श्री.तारीखभाई लोखंडवाला, शैलेश गुल्हाने, राजू पडगीलवार, उत्तम गुल्हाने, गजानन नवदुर्गे, प्रदीप डंभारे,संतोष बोरले, रवी ढोक, अनंता जोशी, बबलू देशमुख, स्वाती येंडे, वैशाली सवई, कल्पना मांगुळकर, मिलिंद रामटेके, निलेश कुळसंगे, माऊली अर्बनचे अध्यक्ष जितेश नावडे, सुजाता जिद्देवार, मालती नावडे, नितीशा खासरे, महेंद्र खासरे, नितीन वऱ्हाडे, ओम फुटाणे व इतर मान्यवर उपस्थित होते.
नवीन वास्तूत माऊली अर्बन तर्फे अत्याधुनिक सेवा, तसेच लॉकर सुविधा, इंटरनेट बँकिंग, टॅब बँकिंग तसेच इतर सेवा उपलब्ध करून देणार आहे.