ताज्या घडामोडी
राष्ट्रसंत मोरारीबापू रामकथा जनसंपर्क कार्यालयाचे आज उद्घाटन

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
येथील दारव्हा रोडवरील चिंतामणी कृषी उत्पन्न बाजार समिती यार्ड, भोयर बायपास जवळ, लोहारा एमआयडीसी यवतमाळ येथे ६ ते १४ सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रसंत श्री. मोरारी बापू यांच्या रामकथा पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन दर्डा मातोश्री सभागृह, दर्डा नगर, यवतमाळ येथे बुधवार ३० जुलै रोजी सायंकाळी ४:३० वाजता
महंत आचार्य श्रीकृष्ण सावरिया बाबाजी यांचे शुभ हस्ते होणार आहे. याप्रसंगी रामकथा पर्वाचे यजमान व आयोजन समितीचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.