दैनिक अमरावती दर्शन सखी समर्पण यवतमाळ तर्फे कर्तुत्ववान व्यक्तिमत्त्व डॉक्टर योगेश दुद्दलवार व सीए अमित ढोरे यांचा सत्कार..
सीए व डॉक्टर डे निमित्त सुंदर कार्यक्रमाचे आयोजन

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
डॉक्टर डे’ व ‘सीए डे ‘निमित्य यवतमाळतील डॉक्टर योगेश प्रफुल दुद्दलवार व सीए श्री अमित वामनराव ढोरे,यांचा ‘दैनिक अमरावती दर्शन’ द्वारा ‘सखी समर्पण यवतमाळ ‘ या ग्रुपच्या वतीने दैनिक अमरावती दर्शन च्या संपादिका प्रगती डोईफोडे तसेच दैनिक अमरावती दर्शनचे यवतमाळ आवृत्तीप्रमुख विजयकुमार बुंदेला यांच्या मार्गदर्शनाखाली पारिवारिक कौटुंबिक सोहळ्यात सत्कार करण्यात आला.
‘डॉक्टर डे ‘निमित्य यवतमाळातील प्रसिद्ध पंचकर्म पारंगत डॉक्टर योगेश प्रफुल दुद्दलवार,यांचा यवतमाळ ब्लड डोनर असोसिएशनचे अध्यक्ष विवेक अरगुलवार यांच्या हस्ते,त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत’ सखी समर्पण यवतमाळ ‘ ग्रुपने शाल श्रीफळ मानचिन्ह देऊन सत्कार केला.ते ‘विश्वशिव’ या आयुर्वेदिक चिकित्सालयाद्वारे वैद्यकीय विद्यार्थ्यांना मोफत प्रात्यक्षिक प्रशिक्षण तसेच अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात.
‘सीएडेनिमित्त’यवतमाळतील प्रसिद्ध सीए श्री अमित वामनराव ढोरे ,यांचा सुप्रसिद्ध सीए श्री अमित अग्रवाल यांच्या हस्ते’ सखी समर्पण ग्रुपयवतमाळ ने’ शाल श्रीफळ मानचिन्ह देऊन सत्कार केला.विविध सामाजिक घटकांना मदत करतात तसेच धडाडीचे उपक्रम राबवतात.
या सत्कार समारंभ प्रसंगी ‘सखी समर्पण ग्रुपच्या’ संयोजिका दुर्गा मिश्रा,मार्गदर्शिका रेखा जगताप,अध्यक्ष डॉ.कल्पना कुलरे ,सचिव सानिका यंबरवार, नितल चौधरी, योगिता वानखडे ,साक्षी अंबरकर डॉ. पूजा सांगळे, डॉ. जयश्री देशमुख, विजया हुडे, संगीता संगीता गुल्हाने मंगला मंगेकर,पद्मा मानधना ,वर्षा चव्हाण,अनघा देसाई उपस्थित होत्या. सोबतच डॉ.अश्विनी गुल्हाने आणि डॉ. अंजली गवारले यांचा देखील डॉक्टर्स डे निमित्त सत्कार करण्यात आला.. दैनिक अमरावती दर्शन द्वारा सखी समर्पण यवतमाळ ग्रुपच्या वतीने राबवताना आलेल्या या उपक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा होत आहे.