भगवान महावीर जयंती निमित्त जिल्ह्यातील सर्व वैध अवैध मास विक्री केंद्र बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
10 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या भगवान महावीर जन्म कल्याणाक महोत्सवा निमित्त यवतमाळ जिल्ह्यातील व शहरातील अवैध कत्तलखाने वैध कत्तलखाने तथा मास विक्री केंद्र हे बंद करण्यात यावे या मागणीचे निवेदन जैन सेवा समितीचे अध्यक्ष महावीर भन्साली व प्रकल्प मार्गदर्शक ऍड संजय जैन यांचा मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी विकास मीना जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शुभम कॅमतवार आदिना भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून देण्यात आले याप्रसंगी भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष उमेश बैद, सचिव संदीप कोचर, उपाध्यक्ष आदेश लुणावत माजी महामंत्री श्याम भन्साली,विजयकुमार बुंदेला प्रकल्प अधिकारी अंशुल तातेड सह प्रकल्प अधिकारी तिलकराज गुगलीया, आशिष देसाई,हर्ष भरूट, कुणाल पोकर्णा, पीयुष तातेड, शुभम खिवसरा आदी प्रामुख्याने उपस्थित होते
शासन निर्णयानुसार भगवान महावीर जयंतीदिनी जिल्ह्यातील व शहरातील वैध अवैध कत्तलखाने मास विक्री केंद्र काटेकोरपणे पूर्णत बंद करण्याचे आदेश परित करून महावीर जयंती दिनी पोलीस प्रशासन, नगर परिषद.जिला परिषद पंचायत समीतीच्या क्षेत्रातील सर्व सर्व प्रकारचे वैध अवैध मास विक्री केंद्र बंद करण्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी यां करिता हे निवेदन सकल जैन समाजाच्या व भारतीय जैन संघटनेच्या वतीने सामान्य प्रशासन विभागाची तहसीलदार अमोल जाधव यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.