क्रांतीज्योती सावित्री सावित्री आईंच्या जयंतीला जिल्ह्यातील शिक्षकांना आरोग्य विषयी मार्गदर्शन व सत्कार

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा यवतमाळ च्या वतीने 3 जानेवारीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे अवचित साधून उद्बोधन कार्यशाळेत जिल्ह्यातील सातशे शिक्षकांना आरोग्य विषयी मार्गदर्शन व आत्मरक्षा विषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील 700 शिक्षकांनी या शिबिराचा लाभ घेतला व यवतमाळ जिल्ह्यातून 22 शिक्षकांचा यावेळी उत्कृष्ट कार्यासाठी सत्कार करण्यात आला. या कार्यशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजयजी कोंबे तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. स्नेहा भुयार, डॉ.अंजली गवार्ले,पोलीस उपनिरीक्षक सारिका पुसे ,उपशिक्षणाधिकारी नीताताई गावंडे ,कवयित्री सपना पावडे ,नानासाहेब नाकोडे जिल्हाध्यक्ष, पुंडलिक रेकलवार ,पतसंस्थेचे अध्यक्ष महेश सोनेकर गजानन देऊळकर किशोर सरोदे प्रफुल फुंडकर ,अशांना गुंडावार संदीप मोवाडे विलास गुल्हाने यांची उपस्थिती होती.आरोग्य विषयी मार्गदर्शन डॉक्टर स्नेहा भुयार व डॉक्टर अंजली गवार्ले,यांनी केले आपले शरीर सुदृढ ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे तसेच आहार याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले तर पोलीस उपनिरीक्षक सारिका पुसे यांनी तान तणावाचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले, स्वतःचे संरक्षण करण्यासाठी महिलांनी स्वतः सज्ज रहा असा मंत्र त्यांनी दिला. सावित्रीच्या लेकींनी या कार्यशाळेतून 700 शिक्षकांना आरोग्याच्या मूलमंत्रंसह आत्मरक्षणाचे धडे घेतले. तसेच कवयित्री स्वप्ना पावडे व उपशिक्षकांना अधिकारी नीताताई गावंडे यांनी विचार व्यक्त केले ,अध्यक्ष श्री विजयजी कोंबडी यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले.
यामध्ये 22 कर्तुत्वावर शिक्षकांना शाल व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनिता झुरळे शुभदा येवले कुमुद डाखोरे नीलिमा पाटील यांनी केले या कार्यशाळेत 18 शिक्षकांसह पाच महिला विस्तार अधिकाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. ही कार्यशाळा यशस्वी करण्याकरता प्रफुल फुंडकर शालिनी शिरसाट सुनिता गु गाणे अर्चना भरकाडे पुंडलिक रेकलवार संदीप मोहोळ सुनीता जतकर आशांना गुंडवार विनोद क्षीरसागर विजय लांडे भाऊंना राजांचा मेंढे शुभदा येवले नम्रता दिसणे स्वाती महाजन जिल्हा महिला उपाध्यक्ष तसा सर्व तालुका महिला पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले असे राजांचा मेंढे यांनी कळवले आहे.