जिल्हाधिकारी, अधिक्षक शुल्क उत्पादन यांचीच तक्रार मुख्य सचिव कडे दाखल. सि. आय डी. मार्फत तपासाची रजनीकांत बोरेले यांची मागणी … मामला दारु तस्करीचा

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
पांढरकवडा मेथील व्हिसल ब्लोअर रजनीकांत डालुरामजी बोरेले यांनी शुल्क उत्पादन अधिक्षक पवतमाळ आणि शुल्क उत्पादन निरिक्षक पांढरकवडा यांच्या आशिवादाने देशी, वाईन शॉप, बिअर बार नियमाचे भंग करून दारु टि.पी. ज्या ठिकाणची असते त्या ऐवजी इतर ठिकाणी दारु विकली जात असते, दुकाने नियमानुसार उपडणे बंद करणे या प्रकरणी परवाना रद्द करणे, उल्लेखित अधिकारी विरुध्द कार्यवाही करुन त्यांच्या संपत्तीची तपास करणे याबाबत दि. 25.11.2024 रोजी तक्रार जिल्हाधिकारी यवतमाळ कडे केली होती. चोरले यांनी तक्रारीत मागणी केली होती की स्वतंत्रीय समिती गठीत करुन चौकशी करण्यात यावी, परंतु जिल्हाधिकारी यांनी ज्या अधिकारी विरुध्द गंभीर तक्रार होती त्यांच्याकडेच तक्रारीची चौकशी करण्याकरीता तक्रार पत्र दिले आहे. सदरहू कृत्य गैरकायदेशीर असून ज्यांच्या विरुध्द गंभीर आरोप त्यांच्याकडेच तक्रारीची चौकशी दिल्याने तक्रारीला न्यायमिळू शकत नाही.
पांढरकवडा पसिरात दारु तस्करी चे कार्य अनेक वर्षापासून सुरु आहे ही बाब शुल्क उत्पादक अधिक्षक पासून ते शुल्क उत्पादन निरिक्षक यांच्या पर्यंत सर्वानाच माहिती असतांनाच आर्थिक स्वार्थापोटी पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून सरदहु गोरखयंदाना अलिखीत परवाना देऊन अभय दिले जात होते. त्यामुळे 1.1.2025 रोजी पहाटे 2.00 वाजता मौजा सोनवडी जवळ I.T.I च्या बाजुला देशी दारु वाहतुक करीत असतांना खाजगी मारुती ओमणी चारचाकी वाहन चा अपघात घडला त्यात राम मुत्यलवार रा. पांढरकवडा यांचा मृत्यु झाला. त्यांच्या मागे शिक्षण घेणारा मुलगा आणि पत्नी आहे. घरचा कुटुंब प्रमुख व कर्ता मृत्युक होता आणि मृत्युक देशी दारु दुकानदाराकडे खाजगी नोकरी म्हणून होता. दररोज रात्री 11.00 ते 4.00 वाजेपर्यंत ग्रामीण भागात देशी दारु वाहतुक करण्याचा काम करीत होता. अशा अनेक वाहनाद्वारे देशी दारु तस्करीचे काम रात्र-बेरात्री बन्याच वर्षापासून सुरु आहे. परंतु 01 जानेवारी 2025 ला घटना घडल्याने आणि पांढरकवडा पोलीसांना घटनास्थळ मोका पंचनामाच्या वेळी 500 देशी दारुच्या बॉटल्या हस्तगत केली आणि दारुचा गुन्हा सुध्दा दाखल करण्यात आला. त्यामुळे संपुर्ण प्रकरण उजेडात आले.
सदरहु देशी दारु वाहतुक ज्या खाजगी वाहनात केली जात होती ती वाहन मालवाहतुक करणारी नसल्याने सदरहु मारुती ओमणी खाजगी वाहन कोणाच्या नावाने नोंद आहे आणि देशी दारु तस्करी करीत असतांना अपघाताच्या ठिकाणी वाहनात सापडल्या त्या वाटलीत कोणत्या कंपनीची आहे आणि त्याचे चंच नंबर काय ? आहे किंवा दारु विना शुल्क, टि.पी. ची अथवा बनावटी विषारी दारु, गळप केलेली होती किवा कशा प्रकारची होती तसेच ती दारु केणत्या फॅक्टरी मधुन कोणत्या देशी दारु परवानाधारक दुकानदाराने किंवा ठोक देशी दारु खरेदीदार याने खरेदी केली होती त्याबाबत संपुर्ण तपास गुन्हे अन्वषेण भरारी पथक नागपूर किवा पुणे विभाग यांच्या मार्फत करुन दोषो व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करुन अटक करपणे आणि आजपावेतो किती हजारो देशी दारु पेटीची तस्करी केली आहे त्याची कार्यवाही करुन परवाना रद्द करावे व आज पावेतो बुडविलेली उत्पादन शुल्काची आर्थिक वसुली आर्थिक दंडासह वसुल करुन राज्यशासनाच्या कोषागारात जमा करण्याची कार्यवाही करणे अत्यंत आवश्यक आहे.
देशी दारू वाहतुक करणारे राम मुत्यलवार अनेक वर्षापासून 10 ते 15 हजार रूपये महिना वेतनाने दारु व्यवसायीक यांचेकडे खाजगी नोकरी करीत होता अपघातात त्यांचा जीव गेला आहे, त्यांचे कुटुंबावर दुखाचे डोंगर कोसळले असून आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंबियाचे उदरनिर्वाह आणि मुलाचे शिक्षण सुरळीत सुरू राहण्याकरीता अनेक अडचणी निर्माण झाल्या आहे त्यामुळे शासनाने कुटुंबातील व्यक्तीला शासकीय नोकरी दयावी आणि कोटी रुपयाची आर्थिक मदत दयाची
बोरेले यांनी दिः 25.11.2024 रोजी जिल्हाधिकारी यवतमाळ यांचेकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीमध्ये देशी दारू एका विकाणाची दुसन्या ठिकाणी नेऊन विकली जाते म्हणजेच दारूची तस्करी केली जाते त्याचवरोचर नियमानुसार देशीदास वाईन शॉप, विअर बार किती वाजता उचडायचे आणि किती वाजता बंद करणेवाचत नियमावली आहे शिवाय दारु पिण्याचा परवानाधारक यांनाच दास विक्री करायची असते शिवाय दारुची खरेदी साठा पुस्तक आणि विक्री केल्याबाबतचे हिशोब मध्ये प्रचंड तफावत आहे शुल्क उत्पादन अधिक्षक व शुल्क उत्पादन निरिक्षक यांच्या आर्शिवादाने हे गैरकायदेशीर धंदे सुरु असल्याचे आणि कर्तव्यात कसूर केल्याचे आणि गस्त छापेमारी, स्टॉक पडताळणी कर्तव्य भाग रजिस्टर मध्ये नोंद वाहनाचे वापर केल्याबावत डिझेल लॉग पुस्तीका, दारु दुकाने तपासणी करणे, दारु वाहतुक टि.पी. इत्यादी गंभीर बाब याबाबत शुल्क उत्पादन अधिक्षक कार्यालय च्या अभिलेखावर माहितीच उपलब्ध नाही असा भोंगळ कारभार असल्याचे निष्पन्न झाले आहे
याशिवाय दारु दुकाने सुरु करणे आणि बंद करण्याचे नियम भंग प्रकरणी अनेक वर्षात फक्त 07 कार्यवाही झाली आहे ते सुध्दा वणी परिसरात, पांढरकवडा परिसरात शुन्य कार्यवाही आहे. प्रत्यक्षात पांढरकवडा परिसरात दारुची तस्करी आणि विक्रीची खपत पिणान्या परवानाधारकांपेक्षा शेकडो पट जास्त दारुची विक्री दाखविली जात आहे. दारु पिणा-वा परवानाधारकांची संख्या कमी असतांना व दारु दुकाने अनेक असर्तान लक्षावधी लिटर दारुचीं खपत कशी झाली आहे हे संशोधनाचा विषय ठरला आहे.
रुनीकांत बोरेले यांच्या तक्रारीवर जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी लगेच दखल घेऊन स्वतंत्रीय समिती गठीत करुन तपास बसविले असते आणि दारु अवैध वाहतुकी थांबविली असती तर राम मुत्यलवार यांचा जीव गेला नसता, परंतु जिल्हाधिकारी पंकज आशिया यवतमाळ यांनी ज्या शुल्क उत्पादन अधिक्षक व शुल्क उत्पादन निरिक्षक पांढरकवडा यांच्या विरुध्द गंभीर तक्रारी असतांना चौकशी शुल्क उत्पादन अधिक्षक त्यांच्या कडेच द. 27.11.2024 रोजी दिली आणि नितेश भा. शेंडे अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क यवतमाळ यांनी त्यांचे विभागातील निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क पांढरकवडा यांच्याकडे दि. 19.12.2024 रोजी पुढील कार्यवाही करीता दिली आहे. याबाबत बोरेले यांनी असे प्रश्न असे उपस्थितीत केले की निरिक्षक याला अधिक्षक यांची तपास करण्याचे अधिकार कोणत्या कायदाने प्राप्त झाले आहे आणि शुल्क उत्पादक अधिक्षक विरुध्द तक्रार असतांना अधिक्षक यांच्याकडेच चौकशी करीता आदेश देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना कोणत्या कायदातील प्रचलित तरतुदी प्रमाणे प्राप्त झाले आहे हे न समजणारे कोडे आहे. जखम पायाला आणि पटटी डोक्याला अशी गत केली असल्याचे दिसून येते. त्यामुळे मृत्यक राम मुत्यलवार यांच्या कुटुंबाला एक कोटी रुपयाची आर्थिक मदत जिल्हाधिकारी, अधिक्षक शुल्क उत्पादन व निरिक्षक शुल्क उत्पादन यांच्या मिळकतीतून वसुल करुन देण्यात यावी व कुटुंबातील व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी आणि तक्रारीचा संपुर्ण तपास गुन्हे अन्वेषण भरारी पथक नागपूर किवा पुणे यांच्या मार्फत करण्यात यावे अशी मागणी रजनीकांत बोरेले यांनी मुख्य सचिव राज्य शासन आणि सचिव शुल्क उत्पादन राज्य शासन मंत्रालय मुंवई यांच्याकडे केली आहे.