ताज्या घडामोडी
इनर व्हील क्लब तर्फेजागतिक आरोग्य दिना निमित्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
जागतिक आरोग्य दिनानिमित्त, यवतमाळच्या इनर व्हील क्लबने रोटरी क्लब ऑफ यवतमाळच्या सहकार्याने ३० वंचित रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या, ज्यामुळे त्यांची दृष्टीत सुधारणा आली आणि त्यांचे जीवनमान सुधारले. सर्व शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या, प्रत्येक रुग्णाच्या शस्त्रक्रियेनंतर डोळ्यांचे चष्मे, डोळ्याचे आयड्रॉप आणि औषधे देण्यात आली.
ह्या शिबिरासाठी रोटे. निलेश ढुमे ह्यानी आर्थिक सहकार्य केले. ह्या शिबिराच्या वेळी रोटरी क्लब च्या अध्यक्षा सौ. राजश्री धर्माधिकारी, इनर व्हील क्लब च्या अध्यक्षा प्रांजली ढुमे , रोटरी क्लब तथा इनर व्हील क्लब चे पदाधिकारी डॉ पद्मावार, श्री अनंत पांडे, डॉ माणिक मेहेरे, सोनाली शिंदे प्रामुख्यानं उपस्थित होते.