ताज्या घडामोडी
फिजियोथेरेपी मध्ये मास्टर गोल्ड मेडालिस्ट डॉ. निकीता हितेश सेठ चा गुजराती समाजा तर्फे सत्कार

यवतमाळ : येथील अग्रवाल – ले आऊट निवासी व दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन सावंगी मेघे वर्धा ची विद्यार्थीनी कु. डॉ. निकीता रेखा हितेश शेठ हिने फिजियोथेरेपी (न्यूरोलॉजी) मध्ये मास्टर्स गोल्ड मेडालिस्ट पदवी प्राप्त केल्या बद्दल सकल गुजराती समाजाच्या वतीने व श्री गुजराती नवरात्री उत्सव मंडळ व गुजराती नवयुवक मंडळ यवतमाळ ने त्यांच्या निवासस्थानी जाऊन पुष्प गुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला. विशेष म्हणजे डॉ. निकीता हितेश सेठ हिने नियमित पणे वर्धा येथून अप डाऊन करून हे उज्वल यश संपादन केले. हि बाब जिल्ह्यातील गुजराती बांधवांन साठी अभिमानाची आहेत. डॉ. निकीता हितेश सेठ हिचे सकल जैन समाज व सकल गुजाराती समाजाच्या वतीने अभिनंदन होत आहेत.