20 नोव्हेंबर जागतिक मूळव्याध दिनानिमित्त नो पाइल्स ओन्ली स्माईल्स 😁😁

शौचास गेल्यानंतर वारंवार रक्तस्त्राव होणे ,मुळव्याधीचे कोंब बाहेर येणे ,शौचास कडक होऊन पोटात दुखणे ,इत्यादी तक्रारीने मूळव्याधीचा रुग्ण त्रस्त असतो.
आहारात बदल करून तसेच वेगवेगळ्या उपचार पद्धतींच्या सहाय्याने त्यांना तात्पुरता आराम मिळतो खरा पण इंजेक्शन घेऊन तसेच शस्त्रक्रिया करूनही रुग्णाला पूर्ण आराम मिळत नाही. असेच वाटत राहते यामुळे आजारावर काही रामबाण उपाय आहे का असा प्रश्न रुग्णांकडून विचारला जातो तर उत्तर आहे हो नक्की नाउ ट्रीटमेंट अवेलेबल अँड नो पाइल्स ओन्ली स्माईल
गुदभागाच्या त्रासाला मुळव्याध म्हणून सर्वत्र ओळखले जाते. मात्र इतर गुदविकार जसे अनोरेक्टल डिसोर्डर्स यामध्ये पाइल्स म्हणजेच हिमोराइड्स तसेच फिशर, फिश्यूला , पेरियानंल अपसेसेस, प्रूरायटीस ॲनी, तसेच कॅन्सरही आहेत. त्यामध्ये कष्ट पूर्वक मल निसरण, गुदभागी फोड असणे, सूज ,कोंब ,या भागातून रक्त, पुयस्त्राव वाहने, वारंवार भयंकर वेदना खाज अशी लक्षणे आढळतात.
मुळव्याध म्हणजे गुदमार्गाच्या खालच्या बाजूला असलेल्या रक्तवाहिन्या सुजणे त्यामुळे वारंवार आवरण कोंबा सारखे वर येते व मूळव्याधीचा त्रास चालू होतो. गुदमार्गाला खाज सुटणे किंवा जडपणा वाटणे असे सुरुवातीला या आजाराचे स्वरूप असते. नंतर वारंवार रक्त जाऊ लागते नंतर खूप दुखणे. बद्धकोष्ठता व बद्धकोष्ठतेमुळे शौचास होण्यासाठी रुग्ण अधिक जोर लावतो त्यामुळे गुदामार्गाच्या नसांवर दाब पडून त्यांना सूज येते व त्या बाहेर डोकावतात. बद्धकोष्ठतेमुळे विस्टा कडक होत असल्याने गुदद्वारापाशी या नसांशी मलांचे घर्षण होऊन नसा फुटतात आणि रक्तस्त्राव होऊ लागतो. गर्भावस्था व प्रसुती नंतरच्या काळात ही समस्या जास्त प्रमाणात महिलांना भेडसावू लागते.
मुळव्याधीचा त्रास सहन होत नाही, एवढा जास्त असेल तर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेऊन आजाराचे योग्य निदान होणे आवश्यक असते. मुळव्याधीसाठी औषधे, पारंपारिक शास्त्रक्रिया पद्धती, आणि अत्याधुनिक शस्त्रक्रिया हे उपाय उपलब्ध आहेत. विविध प्रकारची औषधे सूज तात्पुरती कमी करतात, आयुर्वेदिक औषधी चिकित्सेने प्रदीर्घ काळापर्यंत रुग्णाला आराम मिळवून देऊ शकतात, आयुर्वेदिक औषधी पोटातून त्यासोबत आयुर्वेदिक औषधीयुक्त तेलाच्या साहाय्याने बस्ती, पिचू ,अवगाहन या उपक्रमांनी रुग्णाला बऱ्याच काळापर्यंत फायदा असतो.
गर्भावस्थेत आयुर्वेदिक औषधी चिकित्स्याने अगदी नऊ महिन्यापर्यंत रुग्णाला फायदा मिळतो. भगंदर या व्याधीसाठी आयुर्वेदातील क्षारसूत्र चिकित्सा अत्यंत उपयुक्त आहे.
क्षार सूत्र पद्धतीने भगंदर आणि पायलोनायडल सायनस यांची चिकित्सा केल्याने हे आजार पुन होण्याची शक्यता जवळजवळ नसतेच. 21 व्या शतकातील वैद्यकीय प्रगतीचे दृश्य रूप म्हणजे इंजेक्शन, रबर बाईंडिंग, क्रायो सर्जरी, लेजर ,स्टेपलर, हार्मोनिक स्काल्पेल या शस्त्रक्रिया पद्धती.
इंजेक्शन किंवा रबर बाइंडिंग चा उपयोग अगदी सुरुवातीच्या छोट्या आकारांच्या कोंबांसाठी होतो. शस्त्रक्रिया या पद्धतीमध्ये मूळव्याधीला कारणीभूत सर्व रक्तवाहिन्या अगदी मुळापासून काढता येतात, वेदनाही अगदी कमी असतात, शस्त्रक्रियेनंतर अगदी तिसऱ्या दिवसापासून रुग्ण कामाला जाऊ शकतो. या शस्त्रक्रियेसाठी रुग्णाला फक्त 24 तासांसाठी रुग्णालयात भरती राहावे लागते आणि एकदा शस्त्रक्रिया झाली की पुन्हा मूळव्याध होण्याची शक्यता जवळजवळ नसते.
मुळव्याध एक असा आजार आहे ज्याबद्दल फारसे बोलले जात नाही.महिला डॉक्टरांकडे जाण्यासाठी लाजतात, त्यामुळे हा आजार विकोपाला जाऊन कॅन्सर मध्येही याचे परिवर्तन होऊ शकते. तसेच सर्वच लोक मुळव्याधीसाठी घरगुती उपाय बऱ्याच कालापर्यंत करत राहतात. आणि डॉक्टरांनी व्यतिरिक्त इतरही काही लोक मुळव्याधीचा औषध देऊन दीर्घ काळापर्यंत उपचार करत राहतात त्यामुळे त्या आजाराला तात्पुरता आराम मिळतो पण दीर्घ का काळापर्यंत तिथे इन्फेक्शन राहते. आणि काही इतर अघोरी उपाय करतात. आणि या अज्ञानामुळे दीर्घकाळापर्यंत जखम न बसल्यामुळे त्याचे कॅन्सरमध्ये रूपांतर होऊ शकते. म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांकडून या आजारांची तपासणी करून निदान करणे फार आवश्यक असते. त्यामुळेच डॉक्टरांकडून याचे योग्य निदान व याची ट्रीटमेंट घेणे आवश्यक आहे. संशोधनाअंती असे लक्षात आले आहे की भारतातील ६६% स्त्रियांमध्ये मूळव्याधीची लक्षणे दिसून येतात, बऱ्याच लोकांमध्ये प्रदीर्घ काळापासून असतो आणि तरी देखील त्यापैकी 42% लोकच हा आजार असल्याचे मान्य करतात. अशा या जुनाट आजारांवर उपचारांच्या साह्याने मात करता येईल का? तर उत्तर आहे हो नक्कीच. आहारातील योग्य बदल ,दिनचर्या औषधी चिकित्सा आणि शस्त्रक्रिया पद्धती या सर्वांनी त्याची उपायोजना शक्य आहे.नाऊ नो पाइल्स ओन्ली स्माईल ट्रीटमेंट अवेलेबल फॉर इट
डॉ. अंजली गवार्ले ( एम .एस .शल्य)
मूळव्याध भगंदर तज्ञ
- गवार्ले हॉस्पिटल यवतमाळ