ताज्या घडामोडी
आर एम फिटनेस सेंटरअँड स्पा तर्फे जागतिक महिला दिवस साजरा

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
आर. एम. फिटनेस सेंटर साई मंदिर बाजेरीया नगर यवतमाळ येथे जागतिक महिला दिना निमित फ्रि हेल्थ चेक अप कॅम्प कॅम्पचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये जवळपास १५० महिलां नी सहभाग घेतला उपस्थित सर्व महिलांचे आर. एम फिटनेस सेंटर च्या संचालिका सौ राणी मनोज जयस्वाल यांनी पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला. उपस्थित सर्व महिलाना त्यांचे पास पोर्ट फोटो मोफत देण्यात आले. महिलांन द्वारा संचालित आर एम फिटनेस हे यवतमाळ शहरातील एकमेव केंद्र आहेत. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी आर एम फिटनेसच्या संचालिका राणी जयस्वालडॉ धनराज तिवारी वैष्णवी जयस्वाल, राधिका साखी नंदीनी राठोड, गायत्री राठोड राशीं जैस्वाल निधी मुराई, श्रेया जयस्वाल, श्वेता जयस्वाल आदी प्रयत्नशिल होते.