ताज्या घडामोडी

दिग्रसमध्ये संजय राठोडच का? समर्थकांनीच सांगितले ११ सुत्रं

 

यवतमाळ – विधानसभा निवडणुकीचा महत्वपूर्ण टप्प्या उद्या बुधवारी पार पडत आहे. उद्या मतदानास जाताना मत कोणाला द्यायचे याची निश्चिती करताना काही मतदार ठाम तर काही थोडे गोंधळलेले असतात. परंतु, दिग्रस विधानसभा मतदारसंघात शिवसेना महायुतीचे संजय राठोड यांनाच मतदान का करावे, याचे ११ सूत्रच समर्थकांनी जाहीर केले आहे.

मतदान करण्यापूर्वी प्रत्येक मतदाराने विचारपूर्वक मत द्यावे यासाठी चर्चेत असलेले हे ११ सूत्र म्हणजे, मतदारसंघात नियमित संपर्कात असलेला उमेदवार, सर्वांची कामे करणारा उमेदवार, विकासकामांसाठी निधी खेचून आणणारा उमेदवार, सर्व समाज व धर्माला घेऊन चालणारा उमेदवार, मंत्रालयात वजन असलेला उमेदवार, आरोग्य सेवा मनापासून देणारा उमेदवार, प्रत्येक टर्ममध्ये मतदारसंघात विकासाची असंख्य कामे केलेला उमेदवार, मतदारांसाठी प्रशासनाशी सतत लढत राहणारा उमेदवार, कोणत्याही मध्यस्थामार्फत नव्हे तर थेट मतदारांना सहज भेटणारा उमेदवार, जातीच्या नव्हे तर कामाच्या भरवशावर ओळखला जाणारा उमेदवार आणि कार्यकर्त्याना ताकद देणारा उमेदवार असावा, असे म्हटले आहे. या ११ सूत्रांची छवी दिसते तोच उमेदवार आपण निवडून आणणे हिच सुदृढ लोकशाहीची खरी ओळख आहे. मतदार प्रत्येक निवडणुकीत पक्षासोबतच उमेदवारही निवडून देत असतो. दिग्रस, दारव्हा, नेर मतदारसंघात असा कोण आहे, याचे उत्तर मतदारसंघातील लहान मुलगाही देईल. दिग्रस मतदारसंघात संजय राठोड हेच नाव अबाल वृद्धांच्या तोंडी आहे. त्यामुळे जात, पात, धर्म यात विभागल्या न जाता विकासकामे, जनसंपर्क, लोकांची कामे करून कार्यकर्त्यांना बळ देणारे महायुतीचे उमेदवार संजय राठोड यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन महायुतीचे पदाधिकाऱ्यांसह शिवसेना तालुका प्रमुख मनोज सिंगी, उत्तम ठवकार, मनोज नाल्हे आदींनी केले आहे.

  • ००

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!