जो राहील कायद्यात तो राहील फायद्यात .ठाणेदार केशव ठाकरे यांचे आवाहन

आर्णी कॉटन सिटी न्यूज
हिंदू – मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या आर्णी येथील हजरत बाबा कंम्बलपोष व किसन उर्फ हजरत सैय्यदी बच्चू बाबा यांचा उर्स शरीफ बुधवार , ता. 5 फेब्रुवारी 2025 पासून प्रारंभ होणार आहे. 10 फेब्रुवारी पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात यात्रेत कोणीही कायदा हातात घेऊ नये जो राहील कायद्यात तो राहील फायद्यात असे आवाहन ठाणेदार केशव ठाकरे यांनी केले. आगामी यात्रेत धुमाकूळ घातल्या जाणार नाही याची दक्षता घ्यावी, कायदा मोडणाऱ्याची कदापिही गय केल्या जाणार नाही. जो राहील कायद्यात तो राहील फायद्यात. यात्रेचा सर्व बांधवांनी लाभ घ्यावा. या यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज असून सर्वत्र बंदोबस्त राहणार आहे. यात्रेत चिडीमारी करणाऱ्यावरही विशेष लक्ष राहणार आहे. बाबा कंम्बलपोष हे सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व नागरिकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील ठाणेदार केशव ठाकरे यांनी केले आहे.