आरोग्यजनजागृती कार्यशाळेत डॉ.अंजली गवार्ले यांचा मार्गदर्शन

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
सामाजिक न्याय मंत्रालय भारत सरकारच्या मार्गदर्शनात, जय तुळजाई संस्था, रमाई सांस्कृतिक भवन आयोजित आरोग्य विषयी कार्यशाळेत
प्रसिद्ध मूळव्याध भगंदर तज्ञ डॉ. अंजली गवार्ले, यांनी आहार विहार, दिनचर्या, व्यायामाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपस्थित व्यासपीठावर ऍड.प्राजक्ता टिकले, चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रामदास बनकर, रामदास वीर, अध्यक्ष पवन धुरट , वनिता हाडके, मीना नेमाडे, प्रकल्प अधिकारी आकाश धुरट उपस्थित होते. गवार्ले पाइल्स हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. अंजली गवार्ले आहारामुळे होणारे आजार मुळव्याध, भगंदर, स्त्रियांच्या आजार आणि कॅन्सर याविषयी माहिती आणि मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत उपस्थित त्यांनी केलेल्या प्रश्नांचे उत्तर देत, डॉ. अंजली गवार्ले यांनी, शौचाच्या ठिकाणी होणारे आजार होणारे, आजार, योग्य वेळी आणि योग्य आहार,मेडिटेशन ,योगा याचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले. व्यसनमुक्ती कार्यकर्त्या संगीता पवार यांनी व्यसनापासून दूर राहून, मोबाईल अति वापर टाळणे, असे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री राजकुमार भितकर व सुकांत वंजारी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉ.अंजली गवार्ले यांच्या सामाजिक वैद्यकीय कार्यासाठी त्यांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
समाजोपयोगी उपक्रम राबवल्याबद्दल प्रकल्प अधिकारी आकाश सर्वत्र कौतुक होत आहे. या परिसरातील महिला पुरुष, तसेच सर्व नागरिकांन या कार्यशाळेचा लाभ घेतला.