भगवान महावीर स्वामी जन्म कल्याण महोत्सवानिमित्त पाच दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन
प्रभात फेरी अहिंसा रॅली अन्नदान वस्त्रदान विविध स्पर्धांचे आयोजन

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
भारतीय जैन संघटना यवतमाळ च्या वतीने भगवान महावीर स्वामी च्या 2624 च्या जन्म कल्याणाक महोत्सवानिमित्त दिनांक 6 एप्रिल ते 10 एप्रिल पर्यंत पाच दिवसीय भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे 6 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता आराधना भवन येथे धार्मिक अंताक्षरी स्पर्धेचे आयोजन प्रकल्प संयोजक ब्राम्ही श्रविका मंडळ तसेच संगीत मंडळ यवतमाळ हे आहेत
तर दिनांक 7 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता केसरीयां भवन यवतमाळ येथे भगवान महावीर जन्म कल्याणाक वर आधारित नाटिका प्रकल्प संयोजक मैत्री मंडल त्रिशला मंडळ हे आहेत
दिनांक आठ एप्रिल रोजी महावीर पाणपोईचे उद्घाटन समारोह सकाळी नऊ वाजता स्टेट बँक चौक यवतमाळ येथे लोकप्रिय आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या शुभहस्ते प्रमुख अतिथी किशोर बाबू दर्डा लोकमत समूह यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे महावीर युवक मंडळ जोश फाउंडेशन व सकल जैन समाज यवतमाळ हे असून दुपारी तीन वाजता आराधना भवन येथे जैन क्रिकेट प्रश्नमंच चे आयोजन करण्यात आले आहे प्रकल्प संयोजक आदी कुशल मंडळ एवं आनंद मंडल
सायंकाळी सात वाजता केशरिया भवन यवतमाळ येथे रायपूर येथील सुप्रसिद्ध गायक राहुल झाबक यांचे एक शाम महावीर के नाम भक्ती संध्याचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे प्रायोजक सौ सीमा किशोरजी दर्डा हेआहेत. दिनांक 9 एप्रिल रोजी सकाळी आठ ते नऊ वाजता पर्यंत देवजी निसर जैन धर्मस्थानाक येथे नवकार महामंत्र सामुहिक जाप चे आयोजन करण्यात आले आहॆ दुपारी तीन वाजता आराधना भवन येथे धार्मिक खेल प्रतियोगिता व आनंद मेळाव्याचे आयोजन वुमेनिया ग्रुप व जैन महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे
तर 9 एप्रिल रोजी संध्याकाळी साडेसात वाजता केशरीया भवन यवतमाळ येथे सामूहिक भक्ती संध्या चे आयोजन करण्यात आले आहे प्रकल्प संयोजक श्रुत भक्ती मंडळ हे आहेत
10 एप्रिल रोजी भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सवानिमित्त सकाळी साडेसहा वाजता बोरास्थानात येथून भव्य प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे शहराच्या प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत ही प्रभात यात्रा श्रीमद राजचंद्र ज्ञान मंदिर राजेंद्र नगर येथे विसर्जित होईल. 10 एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता आराधना भवन यवतमाळ येथून अहिंसा संदेश रॅलीचे विशाल आयोजन करण्यात आले आहे हि रॅली शहराच्या प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत वसंतराव नाईक मेडिकल कॉलेजच्या प्रांगणात विसर्जित होईल या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार योगेश देशमुख एलसीबी चे पोलीस निरीक्षक सतीश चवरे हे राहणार आहेत.
दहा एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णांना फळ व बिस्कीट वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर दुपारी एक वाजता नंदादीप फाउंडेशन येथे अन्नदान व वस्त्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे स्वरचित कविता प्रतियोगिता तसेच 30 सेकंदाची नवकार मंत्र रील प्रतियोगितेचे आयोजन करण्यात आलेले आहे. 10 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता समारोपय कार्यक्रमाचे आयोजन केसरीयां भवन येथे करण्यात आलेले आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोरबाबू दर्डा लोकमत समूह विशेष अतिथी खासदार संजय देशमुख प्रमुख वक्ता भारतीय जैन संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक अमर गांधी हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच जैन एक्सलन्स सर्विस अवार्ड मान्यवरांना प्रधान करण्यात येणार आहे वरील सर्व उपक्रमात सकल जैन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान भारतीय जैन संघटना यवतमाळ च्या वतीने करण्यात आले आहे.