राजकीय

‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’  मा.एकनाथराव शिंदे साहेब

 

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मा.एकनाथराव शिंदे साहेबांचा ९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस.आमच्या शिवसेनेचे सर्वच नेते, कार्यकर्ते यांच्या दृष्टीने हा फक्त वाढदिवस नसून मोठा उत्सवाचा दिवस आहे.मा.एकनाथराव शिंदे साहेबांचा वाढदिवस हा केवळ एक सोहळा नसून लोकसेवेचा एक भाग आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयांमधून आणि उपक्रमांतून ते “सामान्य माणसासाठी समर्पित नेता” असल्याचे अधोरेखित होते. त्यांच्या समर्थकांसाठी हा दिवस एक प्रेरणा आणि जल्लोषाचा दिवस ठरत आहे.

मा.एकनाथराव शिंदे साहेबांचा राजकीय प्रवास संघर्षमय राहिला आहे.शाखा प्रमुखांपासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत अशी भल्या भल्यांना अचंभीत करणारी वाटचाल त्यांची आहे. शिवसेनेत काम करत असताना त्यांनी अनेक संकटांचा सामना केला.पक्षात वैचारिक उठाव केल्यानंतर त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेने भाजपसोबत युती करत राज्यात 2022 साली सत्ता स्थापन केली आणि मा.एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले.

मा.एकनाथराव शिंदे साहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळताना अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली.शेतकऱ्यांना मोफत वीज,जुनी वीजबिल माफी,शेतीमालाला योग्य भाव देण्यासाठी भावांतर योजना,सुशिक्षित बेरोजगारांसाठी लाडका भाऊ योजना,जेष्ठांसाठी मोफत तीर्थ दर्शन योजना,आरोग्य सेवा व्यापक करणे साठी साठी 5 लक्ष रुपये पर्यंत मोफत आरोग्य सेवा,फक्त एक रुपयात पीकविमा असे अनेक लोकोपयोगी निर्णय महायुती सरकारचे माध्यमातून त्यांनी घेतले.मुख्यमंत्री सहायता निधीतून हजारो रुग्णांना ‘न भूतो’ अशी मदत करण्यात आली.या सर्व निर्णयांमुळे राज्यात विक्रमी मतांनी महायुतीची सत्ता येण्यास मदत झाली.ह्या शिवाय मुंबईतील पाच प्रमुख टोलनाक्यांवर हलक्या वाहनांसाठी टोलमाफी लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे मध्यमवर्गीय मुंबईकारांना दिलासा मिळाला आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देवनार डम्पिंग ग्राऊंडची १२५ एकर जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला पद्मविभूषण रतन टाटा यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दमणगंगा-एकदरे-गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता देण्यात आली आहे, ज्यामुळे राज्यातील जलसंपदा व्यवस्थापन सुधारण्यास मदत होणार आहे.सततच्या पावसामुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे मदतीच्या बाबतीत इनडीआरएफ चे निकष डावलून शेतकऱ्यांना दुप्पट मदत करण्याचा निर्णय मा.एकनाथ शिंदे साहेबांनी व महायुती सरकारने घेतला.सामाजिक दृष्ट्या दुर्लक्षित बंजारा समाजासाठी देखील मा.एकनाथराव शिंदे सरकारने मोठे निर्णय घेतले.त्यात वनार्टी ची स्थापना,बंजारा साहित्य अकॅडेमीस मान्यता,बंजारा समाजाचे प्रमुख धार्मिक स्थळ पोहरादेवी येथे 700 कोटींच्या कामांना मान्यता हे प्रमुख निर्णय आहेत.आगरी समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. त्याच बरोबर अठरा पगड जातीतील अनेक लहान मोठे समाजांच्या अडी अडचणी समजून घेऊन त्यांचे साठी महामंडळांच्या स्थापनांचा निर्णय मा.एकनाथराव शिंदे यांचे नेतृत्वात घेण्यात आला.

सर्वच दृष्टीने विचार केल्यास सर्वसामान्य जनतेचा विचार करणारा सर्वसामान्य राहणीमान असलेला नेता अशी ‘कॉमन मॅन’ ही ओळख मा. एकनाथराव शिंदे साहेबाना जनतेनी दिली आहे.महाराराष्ट्रातील महिला भगिनींच्या ‘लाडका भाऊ’ ही देखील त्यांची ओळख आहे.महायुतीचे सरकार महाराष्ट्रात पुन्हा भरगोस मतांनी निवडून आल्यावर मा.एकनाथराव शिंदे साहेबांकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आली.या नवीन जबाबदारीचा उल्लेख त्यांनी DCM म्हणजे जनातेप्रति ‘डेडिकेटेड कॉमन मॅन’ असा केला.व त्याच अनुषंगाने ते महाराष्ट्रातील जनतेची कामे पुन्हा नवीन उभारीने करीत आहेत.शिवसेना पक्ष देखील त्यांचे नेतृत्वात वाढत आहे.खरी शिवसेना कोणाची ह्या प्रश्नाचे उत्तर मा.एकनाथराव शिंदे साहेबांनी निवडणुकीतील यशाद्वारे विरोधकांना दिले आहे.आज वाढदिवसाचे निमित्य मा.एकनाथराव शिंदे साहेबांविषयी मी एवढेच सांगू शकतो की

गरजूंसाठी तो धावून येतो शोषिकांसाठी उभा ठाकतो,विरोधकांना पुरून उरतो हिंदुत्वाची तो शान राखतो,गरिबांना तो आधार देतो वंचितांनाही न्याय देतो,कार्यशून्य अशा टीकाकारांना कामातून तो उत्तर देतो..!!

आमच्या व्हाटसअप ग्रुप ला जॉइन व्हा

मा.ना. एकनाथराव शिंदे साहेबांचे पुढील कार्यकाळात त्यांचे माध्यमातून सामान्य जनतेची,माता भगिनींचे जीवनमान उंचावणारी,युवकांचे उज्वल भविष्य घडवणारी कामे निरंतर सुरू राहो ह्या सदीच्छेसह मी त्यांना आरोग्यदायी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो.

 

 

संजय राठोड

मंत्री,मृद व जलसंधारण महाराष्ट्र राज्य

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!