ताज्या घडामोडी

 बुद्धीला चालना देणाऱ्या खेळांची नितांत गरज माजी आमदार कीर्ती बाबू गांधी

जिल्हास्तरीय बुध्दीबळ स्पर्धा संपन्न

 

 

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज

२९ जून रोजी सिध्दकरनजी रिदकरनजी कुचेरीया स्मृती निमित्त यवतमाळ जिल्हा बुध्दीबळ असोसिएशन च्या वतीने स्थानिक दिपलक्ष्मी मंगल कार्यालय धामणगाव रोड यवतमाळ येथे जिल्हास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेचे सफल आयोजन संपन्न झाले पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी माजी आमदार कीर्तिबाबु गाँधी लोकमत सखी मंचच्या संयोजिका सिमा दर्डा बुद्धीबळ असोसिएशन चे अध्यक्ष ऍड जिवन पाटील,दैनिक अमरावती दर्शनचे यवतमाळ आवृत्ती प्रमुख विजय कुमार बुंदेला मराठी सिने अभिनेत्री सरला इंगळे सचिव मोहन केळापुरे युवा उद्‌योजक विलास कुचेरीया , सौ. शिला कुचेरीया, रजत वानखडे, आकाश पुंडे, सुशांत सुर्यवंशी आदी मान्यवर मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी आपल्या अध्यक्ष पर भाषणातून मार्गदर्शन करताना माजी आमदार कीर्ती बाबू गांधी यांनी बुद्धीला चालना देणाऱ्या खेळांची नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन करून उत्कृष्ट आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.

जिल्हास्तरिय बुध्दीबळ स्पर्धेत प्रथम अनिल प्रसाद द्वितीय नमन मोर तृतीय अर्थव केळकर चवथे हार्दीक अग्रवाल पाचवे करणसींग पवार सहावे कनिष्का चक्करवार सातवे लक्ष जयपुरीया आठवे संजय तिवसकर नउवे समर्थ मेश्राम दहावे लक्षजित ठाकरे तर बेस्ट फिमेल सृष्टी काटकुले बेस्ट वैटेरीन गुणवंत मोटघरे यंगेस्ट गर्ल आरीका गोयल आणि आराध्य तोंदवाल, यंगेस्ट बॉय निर्मित विटालकर आणि संभव गुगलिया, सनय चोपडा ,पुनेश मांडवीया श्रीकल्प रुडे ,आदींना मान्यवरांचे शुभ हस्ते रोख पुरस्कार व सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.जिल्हास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेच्या यशस्वी आयोजना बद्दल प्रकल्प अधिकारी हर्षीता विलास कुचेरीया यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सकल जैन समाजा तर्फे पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन हर्षीता कुचेरीया यांनी तर आभार प्रदर्शन शिला कुचेरीया यांनी केले.

आमच्या व्हाटसअप ग्रुप ला जॉइन व्हा
शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!