यवतमाळ डिस्ट्रिक्ट केमिस्ट एंड ड्रगिस्ट असोसिएशन च्या निवडणुकीत परिवर्तन ची लहर

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
येत्या २९ डिसेंबर रोजी यवतमाळ डिस्ट्रिक्ट केमिस्ट एंड ड्रगिस्ट असोसिएशन ची निवडणूक होत असुन जवळपास २२०० केमिस्ट सदस्य आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे.निवडणुक तीन पदांसाठी होणार.अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष.गेल्या ३ सत्रापासून म्हणजे गेली ९ वर्ष तेच पदाधिकारी पदावर आहे व या निवडणुकीत त्यानी आपली उमेदवारी राखली आहे.या संघटनेत दर तीन वर्षांनी पदाधिकारी बदलण्याची परंपरा आहे ही परंपरा हे पदाधिकारी आल्या नंतर भंगली त्यामुळे सर्वसामान्य सदस्यांत व त्यांच्या सहकारी वर्गात या पदाधिकाऱ्या प्रति असंतोष निर्माण झाला व जिल्हा कार्यकारिणी सभेत निवडणूकीची घोषणा होताच सदस्यांच्या भल्या साठी योग्य कार्यप्रणाली राबविण्यासाठी परिवर्तन पॅनल चा उदय झाला.सामाजिक कार्याला वाहिलेले सुरेश राठी हे अध्यक्षपदासाठी तर सेवेचे तळमळ असणारे गजानन भोकरे हे सचिव पदाचे व विभिन्न विषयांत तज्ञ अभिजीत उर्फ अनुप किन्हीकर हे कोषाध्यक्ष पदाचे परिवर्तन पॅनल चे उमेदवार आहे.निवडणुका निष्पक्ष व योग्यतेने व्हावी म्हणून शिस्ती प्रमाणे महाराष्ट्र राज्य केमिस्ट संगठनेच्या निरिक्षणात ही निवडणुक राज्य संघटनेचे चे संगठन सचिव मदन पाटील, अमरावती झोन चे सचिव धर्मेंद्र थोरात व त्यांचे अकोल्याच्या १२-१५ सहकार्या द्वारे रुख्मिणी मंगल कार्यालय वनवासी मारोती च्या मागे आर्णी रोड येथे सकाळी ९ ते ५ वाजे पर्यंत संपन्न होणार आहे.जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप नागवानी असुन त्यांची चमु उत्कृष्ट पणे निवडणूक प्रक्रिया राबवत आहे.
परिवर्तन घडवून आणण्यासाठी जिल्ह्यातील अधिकांश केमिस्ट सदस्य तत्पर दिसुन येत आहे.संगठनेचे बरेच माजी अध्यक्ष व अन्य पदाधिकारी परिवर्तन पॅनल सोबत असुन अन्य सदस्यांचे सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.सुरेश राठी, गजानन भोकरे, अभिजीत किन्हीकर या परिवर्तन पॅनल च्या तिन्ही उमेदवारांनी प्रत्येक केमिस्ट ला भेटुन,सभा घेउन केमिस्ट परिवार उन्नत व्हावा, ग्राहकांना सचोटीने सेवा देता यावी यासाठी कार्य करु व परत एका पदावर एका कार्यकाळा साठीच राहु हे वचन दिले आहे.
परिवर्तन चे सकारात्मक वातावरण केमिस्ट संगठनेच्या या निवडणुकीत दिसुन येत आहे.परिवर्तन ची ही लहर सुनामी होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे काही केमिस्ट सदस्यांनी मत प्रदर्शन केले आहे.मतदार जागरुकतेने निडर होऊन मतदान करतील असे चित्र जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात दिसत आहे.