किशोर दर्डा यांचे प्रतिपादन : विविध स्पर्धांचे पुरस्कार वितरण

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव समाजातील सर्व घटकांना संघटित करून मोठ्या प्रमाणावर साजरा करावा. सकल जैन समाज एक संघ कसा राहील या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे असे प्रतिपादन सकल जैन समाजाच्या वतीने आयोजीत समारोपिय कार्यक्रमात लोकमत कार्यलय प्रमुख किशोर दर्डा यांनी केले. ते पाच दिवशीय महावीर जन्म कल्याणक महोत्सवाच्या समारोपिय कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
भगवान महावीर जयंतीच्या निमीत्ताने ६ ते १० एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे बक्षिस वितरण केशरिया भवनमध्ये पारपडले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जैनसेवा समितीचे अध्यक्ष महावीर भन्साली, श्वेतांबर मुर्तीपूजक संघाचे अध्यक्ष सुभाष जैन, भारतीय जैन संघनेचे अध्यक्ष उमेश बैद, सचिव संदीप कोचर, प्रकल्प अधिकारी अंशुल तातेड उपस्थित होते.
समारोपिय कार्यक्रमात लोकमत कार्यालय प्रमुख किशोर दर्डा आणि लोकमत सखी मंचच्या जिल्हाध्यक्षा सीमा किशोर दर्डा यांचे शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी क्रीडा तसेच सामाजिक व धार्मिक क्षेत्रात बहुमोल योगदान देणारे तिलकराज गुगलीया, जनसेवा समितीचे अध्यक्ष डॉ. रमेश खिवसरा, महिला मंडळाच्या करुणा कोठारी, यांना यावर्षीचा जैन एक्सलन्स सर्विस अवार्ड मान्यवराच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सामुहिक भक्तीसंध्या, धार्मिक नाटीका ठरल्या लक्षवेधक
महावीर जन्म कल्याण महोत्सवानिमित्त आयोजित धार्मिक अंताक्षरी, धार्मिक नाटिका, जैन क्रिकेट प्रश्नमंच, धार्मिक स्पर्धा, सामूहिक भक्ती संध्या यातील विजयी सर्व स्पर्धकांना सीमा किशोर दर्डा परिवाराच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय क्रमांकाचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी सीए प्रकाश चोपडा यांनी जैन धर्माच्या श्रेष्ठतेबद्दल मार्गदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी अंशुल तातेड यांनी केले. संचलन अशोक कोठारी यांनी केले. समारोपिय कार्यक्रमाला कोषाध्यक्ष आदेश लूनावत, जिल्हा वकील सघचे अध्यक्ष ॲड. संजय सिसोदिया, माज़ी महामंत्री श्याम भंसाली, मंत्री संजय बोथरा, मोहन गांधी, राजू जैन यांच्यासह अनेक मांन्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्याम भन्साली, ॲड. संजय जैन, आनंद भंडारी, दीपक बोरा, गौरव लोढा, नवीन कोठारी, सागर पोकर्णा, अंकित केवळ, प्रियांक लाठीवाला, तुषार सकलेच्या, शुभम छाजेड, ॲड. सुनय मनोज ओसवाल, आशिष देसाई, पियुष तातेड, मंगलेश गादिया, शुभम खिवसरा, हर्ष भरूट, सम्यक सुराणा, ईशा भरूट, हर्षिता कुचेरिया, खुशी कोठारी, सिमरन गेलडा, श्रुती छाजेड, प्रेरणा महेंद्र ओसवाल, आयुषी बुंदेला, गतिका छाजेड, साक्षी दर्डा, डॉ. रुषभ बोरा, सीए. सुशील कटारिया, अंकित जैन, आशीष देसाई, सीए. सचिन कोठारी, करुणा कोठारी, सीए. विवेक बारलोटा, प्रमोद छाजेड, जिनेश कर्णावट आदींनी अथक परिश्रम घेतले. अशी माहिती प्रसिध्दी प्रमुख विजय बुंदेला यांनी दिली.