सखी समर्पण यवतमाळ च्या वतीने नेत्रा तपासणी शिबीर संपन्न 55 लाभार्थी नी घेतला लाभ

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
सामाजिक क्षेत्रात अग्रेसर दै अमरावती दर्शन द्वारा सखी समर्पण यवतमाळ ग्रुप Spectra vision optics यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खास महिलासाठी व यवतमाळ कराकरिता दिनांक 11व 12 मार्च या दोन दिवसीय डिजिटल मशीन व नेत्र चिकित्सका मार्फत निशुल्क नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. त्याच बरोबर लाभार्त्यास 15% डिस्काउंट गॉगल चष्मा व वरती देण्यात आले. या शिबिरास महिलांनी व यवतमाळकरं कडून भरगोस प्रतिसाद मिळाला आणि हा कॅम्प मध्ये 55 लाभार्थी नि लाभ घेतला नेत्र चिकित्सक रोहन बरडे. अर्पिता दौलतकर यांनीनेत्र तपासणी केली व शिबीर यशस्वीरित्या पार पडला. सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणारा सखी समर्पण ग्रुपच्या मार्गदर्शिका रेखा जगताप, संयोजिक दुर्गा मिश्रा, अध्यक्षा डॉ कल्पना कुलरे, उपध्यक्षा संगिता पिपराणी, नितल चौधारी सचिव सानिका यम्बरवार, सदस्य भाग्यश्री कवाडे, साक्षी अंबरकर सायली हाबडे, जयश्री लांजेवार, विजया हुडे, मंगला मंगेकर,जयश्री लांजेवार, योगिता वानखडे सरला इंगळे डॉक्टर गणेश सव्वालाखे यशवंत बरडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच दै अमरावती दर्शन च्या संपादिका प्रगती गाईफोडे जिल्हा प्रतिनिधी विजय कुमार बुंदेला याचे हे शिबीर यशस्वी रित्या करण्यासाठी मोलाचे सहकार्य मिळाले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सखी समर्पण यवतमाळ च्या सचिव सानिका यंबरवार यांनी केले.