ताज्या घडामोडी

जनमानसाच्या मनामनात घर केलेले महायुतीचे उमेदवार संजय राठोड यांच्या पाठीशीही जनतेने समर्थपणे उभे राहावे… जीवन पाटील 

 

नेर – यवतमाळ जिल्ह्यातील जनतेच्या आशीर्वादाने पाटील कुटुंबीय समाजकारण आणि राजकारणात यशस्वी झाले. जिल्ह्यातील नागरिकांनी स्व. उत्तमरावदादा पाटील यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून दादांना सहा वेळा खासदार म्हणून निवडून देत संसदेत पाठविले. दादांप्रमाणेच आपले कर्तृत्व व नेतृत्वाने दिग्रस, दारव्हा, नेर मतदारसंघात जनमानसाच्या मनामनात घर केलेले महायुतीचे उमेदवार संजय राठोड यांच्या पाठीशीही येथील जनतेने समर्थपणे उभे राहावे व त्यांना निवडून द्यावे, असे आवाहन स्व. उत्तमरावदादा यांचे बंधू जीवनदादा पाटील यांनी केले.  नेर तालुक्यातील उत्तरवाढोणा येथील सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना जीवनदादा म्हणाले, ‘दिग्रस, दारव्हा, नेर तालुक्याशी पाटील कुटुंबीयांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे संबंध आहेत. माझे वडील स्व. देवराव पाटील हे जनपदचे अध्यक्ष असताना दारव्हा विधानसभा मतदारसंघातून ते १९५३ आणि १९५६ असे दोनवेळा आमदार म्हणून निवडून आले. तसेच स्व. उत्तमरावदादा पाटील हे १९७२ मध्ये दिग्रस विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. येथील जनतेने पाटील कुटुंबीयास कायम प्रेम, आशीर्वाद आणि साथ दिली आहे. सर्वांना सोबत घेवून चालण्याची उत्तमरावदादा यांची परंपरा या मतदारसंघात त्यानंतर २००४ मध्ये आमदार झालेले संजय राठोड यांनी कायम ठेवली. संजय राठोड हे दारव्हा मतदारसंघात २००४ मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढण्यासाठी उभे राहिले तेव्हा उत्तमराव दादांचे आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी दादांप्रमाणेच समाजासाठी वाहून घ्यायचे आहे, असे सांगितले होते. ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले तेव्हापासून दिग्रस, दारव्हा, नेर मतदारसंघाचा केलेला कायापालट न भूतो न भविष्यती आहे’. आज २० वर्षानंतर स्व्. उत्तमराव दादा पाटील यांच्यावतीने त्यांचा लहान बंधू म्हणून मी संजय राठोड यांच्यासोबत आहो, असे जीवनदादा पाटील म्हणाले.

मतदारसंघात सर्व समाजाला घेवून चालण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. कोणत्याही जाती, धर्माचा भेद न करता सर्वांना समान न्यायाने ते वागणूक देतात, लोकांची अडलेली कामे करतात. लोकांना सहज भेटतात. १० वर्षे मंत्री असुनही दर आठवड्यात मतदारसंघातील जनता दरबारास ते कायम उपस्थित असतात. कुणबी समाजातील अनेक कर्तृत्ववान तरूणांना, महिलांना त्यांनी राजकारणात मोठ्या पदावर संधी दिली, ही समाजासाठी फार मोठी उपलब्धी आहे. मतदारसंघातील पायाभूत विकासासोबतच येथील तरूणांनी शिकून मोठे व्हावे, यासाठी अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, शिष्यवृत्ती, महिलांना स्वयंरोजगार, गारमेंट कल्स्टर, शेती, सिंचन, वीज, आरोग्य, शिक्षण अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांनी केलेले काम असामान्य असे आहे. त्यामुळे उमदेवार निवडून देताना तो संजय राठोड यांच्यासारखा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणारा आणि सर्वांना सोबत घेवून चालणारा असावा, असे जीवन पाटील म्हणाले. बुधवारी मतदान करताना या सर्व गोष्टी लक्षात ठेवून आपले लहान बंधू महायुतीचे उमेदवार संजय राठोड यांना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन यावेळी, जीवनदादा पाटील यांनी केले.

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!