जि.प. कर्मचारी पतसंस्थेचा निव्वळ नफा सात कोटी तेहत्तीस लाख : महेश सोनेकर

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेला सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात सात कोटी तेहत्तीस लाखाचा निव्वळ नफा झाला असुन संस्थेच्या ठेवीत बाढ झाली असल्याची माहीती संस्थेचे अध्यक्ष महेश सोनेकर यांनी दिली.
यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था म. यवतमाळ र.नं.१०९ चे एकुण १०६३२ सभासद असुन संस्थेने आपल्या सभासदांना २५२ कोटीचे कर्ज वाटप केले अमुन संस्थेचे सभासद भाग भांडवल ३६ कोटी १३ लाख रूपये असुन राखीव निधी ४१ कोटी आहे. संस्थेकडे आज रोजी ३३७ कोटी ९० लाख रूपयाच्या ठेवी असुन संस्थेची इतर बँकेमध्ये १६६ कोटी ७९ लाखाची गुंतवणुक आहे. संस्थेचे स्वतचे सुसज्ज मंगल कार्यालय असुन यवतमाळ, दारव्हा पुसद व वणी येथे स्वमालकीचे सुसज्ज कार्यालय आहे तमेच सभासदांच्या सोईकरीता आर्णी व पांढरकवडा येथे शाखा सुरू करण्यात आलेल्या आहे. संस्थेकडुन सभासदांना अधिकतम ५० लाखापर्यतचे कर्ज आजच अर्ज तुरंत कर्ज बँकखात्यात जमा करण्यात येते. संस्था ही आजरोजी पुर्णपणे स्वबळावर असुन आज रोजी संस्थेकडे बँकेचे कुठलेही कर्ज नाही. संस्थेने ठेवीवरील व्याजदरात वाढ केलेली असुन अधिकतम व्याजदर १० टक्के आहे. संस्थेकडुन दरवर्षी १० वी, १२ वी तसेच जेईई, निट मध्ये पाविण्यप्राप्त आणि एमपीएससी तसेच युपीएससी मध्ये पात्र ठरलेल्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार वृक्ष संवर्धन, दुर्धर आजाराकरीता मदत, आदि सामाजीक उपक्रम राबविल्या जाते. आर्थीक वर्षात सभासदांना ३ लाख १० हजाराची मदत निधी देण्यात आली आहे. सभासद कुंटुब आधार योजनेअंतर्गत मागील आर्थीक वर्षात १५ मयत सभासदांचे वारसास प्रत्येकी ६ लाख याप्रमाणे ९० लाख व डीसीपीएस धारकांचे वारसांना १२ लाख या प्रमाणे ८ सभासदांचे वारसांना ९६ लाख रूपये असे एकुण १ कोटी ८६ लाख रूपयाचे वाटप केले आहे. त्याचप्रमाणे सम्थेने मभासदांचा ३० लाखाचा अपघाती विमा उतरविला असुन या अंतर्गत अपघाती मृत्यु पावलेल्या २ सभासदांचे वारसास ५० लाख रूपयाचे क्लेम देण्यात आले. संस्थेने चालु आर्थीक वर्षात मभासद अपघाती विम्याचा हप्ता रु ९८० वरून रु ९०० करून मभासदांची ८०/- ने बचत केली आहे. संग्थेने सर्व सभासदांचे वचत खाते उघडले असुन यावर्षीपासुन लाभाशांची रक्कम त्यांच्या वचत खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तसेच संस्थेने सभासदांच्या कामांना गती येण्यासाठी आरटीजीएस, एनईएफटी, नेट बँकीग सुविधा सुरू केली असुन सभासदांना घरीच मोवाईलव्दारे आपल्या कर्ज खात्याविषयी तसेच ईतर जमा रक्कमेची माहीती मिळणार आहे. तसेच सभासदांना मोवाईलव्दारे आर्थिक व्यवहार करता येणार आहे. संस्थेमध्ये अल्पदरात लॉकर सुविधा उपलब्ध आहे तरी सर्व नागरीकांनी तमेच मभासदांनी लाभ घ्यावा तसेच मभासद हिताच्या दृष्टीने आगामी काळात काही नाविण्यपुर्ण योजना आणण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशिल असल्याची माहीती संस्थेचे अध्यक्ष महेश सोनेकर यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष संजय गावंडे, सचिव संजय बिहाडे, संचालक पोपेश्वर भोयर, मुकेश भोयर, शरद घारोड, विनोदकुमार कदम, अशोक चटप, गजानन पोयाम, तुषार आत्राम, नदिम पटेल, प्रदिप, मोहटे, अभिजीत ठाकरे, स्वप्नील फुलमाळी, विलास टोंगे, सचिन ठाकरे, तेजस तिवारी, सुनिता गुधाणे, विजया राऊत सरव्यवस्थापक मारोती राजगडकर आदि उपस्थित होते.