सकल हिंदू समाज यवतमाळ व्दारा उद्या निषेध सभा व विशाल मोर्चाचे आयोजन

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
बांगलादेशमध्ये हिंदूवर आणि अन्य अल्पसंख्यांक समुदायावर होत असलेल्या अनन्वित अत्याचाराच्या निषेधार्थ तसेच बांगलादेशातील इस्कॉनचे संन्यासी स्वामी चिन्मय कृष्णदास यांना चुकीच्या आरोपांमध्ये अन्यायकारक पध्दतीने बांगलादेश सरकारने तुरूंगात डांबून ठेवले आहे. त्यांची त्वरित सुटका व्हावी या मुख्य मागणीसाठी आणि बांगलादेशातील अल्पसंख्यांक समुदायावर विशेषतः हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाज यवतमाळ व्दारा भव्य मोर्थ्याचे आणि निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
10 डिसेंबर हा जागतिक मानवाधिकार दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो या दिवसाच्या निमित्ताने बांगलादेशामध्ये होणाऱ्या मानवधिकाराच्या, अत्याचाराच्या विरोधात सदर मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
10 डिसेंबर मंगळवार रोजी दुपारी 3 वाजता स्थानिक पोस्टल ग्राउंड, समता मैदान येथून मार्चाला सुरूवात होणार असुन यवतमाळ शहराच्या विविध मार्गाने मार्गक्रमण करीत तिरंगा चौक येथे मोर्ध्याच्या समारोप होईल व त्यानंतर संत मंडळीच्या उपस्थिती मध्ये निषेध सभेचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे, यानंतर लगेचच भारताचे महामहीम राष्ट्रपती यांना जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात येणार आहे.
या मोर्चामध्ये यवतमाळ जिल्हयातील विविध हिंदुत्वादी संघटना, व्यापारी, राष्ट्रीय स्वंयसेवकसंघ, इस्कॉन, मातृशक्ती यांचा सहभाग राहणार आहे. यवतमाळकर नागरीक बंधू भगिनी यांनी या मोर्चामध्ये, निषेध सभेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन अयोजन समितीने केले आहे. या मोर्चामध्ये सहभागी होण्याकरता यवतमाळच्या पाच ठिकाणी एकत्रित येऊन नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजन समितीने केले आहे. यामध्ये एकविरा चौक (दारव्हा रोड), बिरसा मुंडा चौक आर्णी रोड, कॉटन मार्केट चौक, धामणगांवरोड, शारदा चौक, पांढरकवडा रोड, हिंदी हायस्कुल चौक, गोधनी रोड येथे सर्वांनी एकत्रित येऊन समता मैदान येथे सहभागी होण्याचे आव्हान पत्रकार परिषदेमध्ये मिलींद देशकर संयोजक अभय चोपडे जीवन लढी अर्जुन खर्चे मंगला देशपांडे राम साखले परिमल देशपांडे आदींनी पत्रकार परिषदेमध्ये केले आहे.