जैन कार्निवल मुळे सामाजिक एकता दिसून येते~पोलीस अधीक्षक कुमार चिंता..
जैन कार्निवलने 70 हजार यवतमाळकराची मन जिंकली

जैन कार्निवल मुळे सामाजिक एकता दिसून येते.. पोलीस अधीक्षक कुमार चिंता..
यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
जोश फाऊंडेशन ही यवतमाळ शहरातील, सामाजिक क्षेत्रात काम करणारी अग्रगण्य अशी सामाजीक संस्था आहे. या संस्थेच्या वतीने दरवर्षी जैन बिझनेस कार्निवलचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी हे आयोजन 10 ते 13जानेवारी ला समता मैदान (पोस्टल ग्राऊंड) येथे आयोजन करण्यात आले .10 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता उद्घाटन सोहळा क्राइम ब्रांच चे पोलीस निरीक्षक सतीश चावरे शुभहस्ते . बारासोसिएशनचे अध्यक्ष एडवोकेट संजय सिसोदिया जैन सेवा समितीचे अध्यक्ष डॉ. रमेश खिवसरा जैन श्वेतांबर मूर्ती पूजक श्री संघाचे अध्यक्ष सुभाष जैन आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तर 10 ते 13 जानेवारी दरम्यान या जैन बिझनेस कार्निवलचा समस्त यवतमाळ करानी लाभ घेत जैन कार्निवल मध्ये लावलेल्या विविध स्टॉल्सची मुक्तकंठाने प्रशंशा करून खरेदी एमडी बँड नागपूर चे मनोरंजन सदाबहार गीतांचा नजराणा व्यंजनांचा आनंद यवतमाळ करांनी घेतला
13 जानेवारी रोजी जैन कार्निवल चा समारोपिय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता तहसीलदार योगेश देशमुख जैन सेवा समितीचे अध्यक्ष डॉ रमेश खिवसरा
मानव अधिकार संघटन महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष इरफान मलनास कॉटन सिटी न्यूज चैनल चे संपादक विजयकुमार बुंदेला जैन सेवा समितीचे कोषाध्यक्ष जवाहर बोरा जिल्हा वाहतूक शाखेचे निरीक्षक ज्ञानोबा देवकते सर पोलीस स्टेशनचे निरीक्षक वानखडे साहेब आदी मान्यवर याप्रसंगी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता तहसीलदार योगेश देशमुख यांनी जैन कार्निवलच्या प्रत्येक स्टॉलची पाहणी करून मुक्तकंठाने प्रशंशा केली प्रारंभी जोश फाउंडेशन च्या वतीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले
याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी अशा प्रकारच्या आयोजनातून नागरिकांमध्ये नवीन उत्साह संचारतो एक घडामोडी होऊन रोजगारांच्या संधी उपलब्ध होऊन या या जैन कार्निवल मुळे सामाजिक एकता दिसून येते असे प्रभावी विचार व्यक्त केले तर तहसीलदार योगेश देशमुख यांनी अशा प्रकारचे आयोजनाची नितांत आवश्यकता असल्याचे सांगून आयोजकांची मुक्तकंठाने प्रशंसा केली
याप्रसंगी मानव अधिकार संघटन महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने राज्य अध्यक्ष इरफान मनलस राज्य जनसंपर्क अधिकारी विजयकुमार बुंदेला यांच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी जोश फाऊंडेशनचे अध्यक्ष वैभव गुगलीया व प्रकल्पाचे संयोजक शुभम खिवसरा व सन्मानपत्र देऊन सत्कार केला. या जैन कर्णिवल ला जवळपास 70000 नागरिकांनी सदिच्छा भेट दिली.
जोश फाऊंडेशनच्या वतीने आयोजनात सक्रिय सहयोग देणाऱ्या प्रायोजक रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन सोसायटी यवतमाळचे मंदार देशमुख वारको इस्टेटचे आनंद मोर वृंदावन रेस्टॉरंट चे जुनेद मेमन व्ही के इन्फ्रा चे विपुल खिवसरा जोरको चे सृष्टी शेटे पालतेवार ज्वेलर्सचे किशोर पालतेवार टाटा मॅक मोटर्सचे प्रियंका जी देशमुख सागर टेक्स्टाईल चे पराग उपलेंचवार आदींचा सुद्धा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन प्रज्योत कांकरिया समीक्षा अलीझार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जोश फाउंडेशनचे अध्यक्ष – वैभव गुगलिया सचिव – वंदना बोरुंदिया सचिव- जिनेश कर्नावट कोषाध्यक्ष- जयेश बोरा शुभम खिवंसरा गौरव खिवंसरा प्रजोत कांकरियाअर्पित बोरा सम्यक सुराणारा राजेश गुगलिया उमेश बैद अशोक कोठारी इशान बोथारा मोहित सुराणा दिपेश बोराओजस बारलोटा समकित गुगलिया गौरव गुगलिया मंगलेश गादिया रुषभ बोरा चिराग पिपरिया आरती खिवंसरा वर्षा तातेड सीमा तातेड खुशबू भंडारी रानू झांबड ममता बोरा आरती पिपरीया मीनल बोरा साक्षी दर्डा योगिता बरलोटा रिद्धि खींवसरा आदी प्रयत्नशील होते.