सहकार भारती जिल्हा उपाध्यक्षपदी अरुण भिसे यांची नियुक्ती सहाय्यक निबंधक अर्चना माळवे यांनी केला सत्कार

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
जयंत भिसे नागरी सहकारी पतसंस्थे चे अध्यक्ष अरुण भिसे यांची सहकार भारती यवतमाळ जिल्हा उपाध्यपदी जिल्हाध्यक्ष शाम लोखंडे यांनी नियुक्ती केली आहे. श्री. अरुण भिसे हे मागील १४ वर्षापासून जयंत भिसे नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष असून सहकार क्षेत्रात अरुण भिसे यांचे अनमोल योगदान आहे. सामाजिक क्षेत्रात त्यांची भरीव कामगीरी आहे. जयंत भिसे नागरी सहकारी पतसंस्थेला साहाय्य्क निबंधक अर्चना माळवे यांनी आज सदिच्छा भेट दिली. संस्थेचे व्यवस्थापक श्रीकांत अगस्ती व पंकज उदार यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सहकार भारती चे नवनियुक्त उपाध्यक्ष श्री.अरुण भिसे यांचा साहय्यक निबंधक अर्चना माळवे यांनी सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या नियुक्ती बद्दल अरुण भिसे यांचे सहकार क्षेत्रात सर्वत्र अभिनंदन होत आहे, या प्रसंगी संस्थेचे व्यवस्थापक, संचालक मंडळ व कर्मचारी वृंद आवर्जुन उपस्थित होते.