भारत जोडो अभियान यवतमाळ तर्फे 22 एप्रिल रोजी विशेष जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
भारत जुडो अभियान यवतमाळच्या वतीने दिनांक 22 एप्रिल रोजी सकाळी साडेअकरा वाजता जिल्हाधिकारी यवतमाळ यांना विशेष जन सुरक्षा विधेयक रद्द करण्याबाबत भारत जोडो अभियान यवतमाळ जिल्हा समन्वयक उत्तमराव खंदारे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात येणार आहे याप्रसंगी जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती महाराष्ट्राच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात येणार आहे. याकरिता या आंदोलनात या आंदोलनात भारत जोडो अभियान, भारतीय लोकशाही अभियान, किसान अधिकार अभियान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, आम आदमी पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, संभाजी ब्रिगेड, भीम आर्मी, अखिल भारत आदिवासी विकास परिषद, मुस्लिम सोशल फोरम, ओबीसी जनजागृती संघटना, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, आधार संघटना, ए आय एम आय एम, सत्यशोधक समाज, संयुक्त कामगार कृती समिती, युवा सोशल फोरम, राष्ट्रवादी किसान सभा, आयटक, सीटू इत्यादी प्रमुख संघटनांचा सहभाग आहे. असे जन सुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती महाराष्ट्र यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे