ताज्या घडामोडी
लिलाबाई वासनिक यांचे निधन

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
शहरातील सुरभी नगर पिंपळगाव येथील रहिवासी लिलाबाई आनंदराव वासनिक यांचे आज दिनांक 18 मार्च 2025 रोजी दुपारी 4.15 वाजताच्या सुमारास निधन झाले. मृत्यु समयी त्या 68 वर्षांच्या होत्या. गेल्या चार वर्षांपासून त्या आजारी होत्या. उद्या 19 मार्च 2025 रोजी दुपारी 12 वाजता पांढरकवडा रोडवरील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. स्टेट बॅकेचे सेवानिवृत्त रोखपाल आनंदराव वासनिक यांच्या त्या पत्नी होत्या. त्याच्या मागे पती, एक मुलगा, सुन, दोन मुली, जावाई, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे.