सतीश बाळबुधे पत्रकार संरक्षण समितीच्या यवतमाळ जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
पत्रकार संरक्षण समितीच्या यवतमाळ जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पदी सतीश बाळबुधे यांची नियुक्ती पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष विनोद पत्रे यांनी नुकतीच केली आहे.
ना तक्त है ना ताज है , फिर भी “महाराष्ट्र” के सर जमी पे “पत्रकार संरक्षण समिती” का नाम है..!
ना पळणे ना घाबरणे हे ब्रिद वाक्य घेऊन संपूर्ण महाराष्ट्रासह देशातील तीन राज्यात प्रामाणिकपणे काम करत असणाऱ्या “पत्रकार संरक्षण समिती”च्या यवतमाळ जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी सतीश बाळबुधे यांची निवड करण्यात आली. ते दै. देशोन्नती, दै. भास्कर, दै. सकाळ अशा अनेक लोकप्रिय वृत्तपत्रात मागील दहा वर्षांपासून निप:क्षपणे पत्रकारीतेचे व्रत जोपासल्यानंतर ते आता दै. निर्मल विदर्भ, दै. विदर्भ केसरी, दै. सिंहझेप, दै. युवाराष्ट्र दर्शन, दै. यवतमाळ मार्मिक, दैनिक नमो महाराष्ट्र अशा विविध दैनिकात विविध पदावर कार्यरत आहे. त्यांच्या कार्याचा अनुभव पाहता ही निवड करण्यात आली आहे. सध्या ते दैनिक नमो महाराष्ट्र या वृत्तपत्राचे उपसंपादक तथा जिल्ह्यातील एकमेव सांध्य दैनिक यवतमाळ मार्मिक या वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. त्यांची निवड समितीचे संस्थापक / अध्यक्ष विनोद पत्रे , विदर्भ अध्यक्ष संदीप खेडेकर , जिल्हाध्यक्ष दीपक यगड , सचिव वसीम शेख , उपाध्यक्ष श्रीकांत देशमातुरे यांनी केली आहे. तर पत्रकार संरक्षण समितीचे पदाधिकारी प्राध्यापक पंढरी पाथे , कलीम शेख इत्यादी पत्रकारांनी अभिनंदन केले आहे.