महाकुंभ 2025 प्रयागराज मध्ये अन्नछत्र करीता (लंगरसेवा) सहयोग करण्याचे विश्व हिन्दू परिषदेचे आवाहन.

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
महाकुंभ हे 12 वर्षातुन 1 दा होत असतो हया मध्ये प्रयागराज, त्रिवेणी संगम येथे महाकुंभ होणार असून त्यामध्ये संपूर्ण देश विदेशातुन नागा साधु, संत-महंत, हिन्दू बांधव स्नान कराला येत असतात त्यामध्ये त्यांची भोजनाची निशुल्क सुव्यवस्थीत व्यवस्था व्हावी याकरीता विश्व हिन्दू परिषद, विदर्भ प्रांत सेवा विभाग यांच्या माध्यमातुन प्रयागराज येथे मकरसक्रांती ते महाशिवरात्री पर्यत अन्नछत्र (लंगरसेवा) चालविणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रदेश चे सेवा प्रमुख राम लोखंडे यांनी दिली
विश्व हिन्दू परिषदेच्या वतिने प्रयागराज येथे मकरसक्रांती ते महाशिवरात्री अन्नछत्र (लंगर) उभारले जात आहे. या अन्नछत्रा मध्ये समस्त श्रध्दाळू यांना भोजन प्रसाद म्हणून दिला जाणार आहे. या अन्नछत्र (लंगर) बजरंगदलाचे असंख्य कार्यकर्ते स्वतःहून भोजन प्रसाद तयार करण्यासाठी सेवा देणार आहे. त्याकरीता विश्व हिन्दू परिषद यवतमाळ जिल्हयाच्या वतिने सहयोग अभियान सुरू केले आहे. घरोघरी गावागावातील रामभक्त या अभियानामध्ये धान्य पैशाच्या स्वरूपात सहयोग करणार आहे. धान्याची पहिली खेप 7 जानेवारी 2025 ला सकाळी 10 वाजता अन्नछत्र कार्यालय, अवधुतवाडी, यवतमाळ येथून जाणार आहे. लंगरसेवेच्या माध्यमातुन ज्यांना साधु संताच्या महंताच्या भोजन सेवेमध्ये आपला ही वाटा असावा अशी इच्छा आहे अश्या प्रत्येक श्रध्दाळूने अन्नछत्र कार्यालय, अवधुतवाडी, अणे कॉलेज समोर, येथे विश्व हिन्दू परिषदेच्या या निशुल्क लंगर सेवेत यथाशक्ती सहयोग करावा असे आव्हान विश्व हिन्दू परिषद विदर्भ प्रांत सेवा प्रमुख राम लोंखडे यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला
विभाग मंत्री यवतमाळ विभाग प्रदीप खराटे विभाग सहमंत्री यवतमाळ विभाग शाम माकोडे. जिल्हा मंत्री, यवतमाळ जिल्हा ज्ञानेश्वर रूईकरमनोज औदार्य,अजिंदर चावला मनिष बिसेन, गौरव सुचक, सचिन तुरकर, संतोष हरणखेडे, विनोद सानप. विवेक सज्जनार, अजय उन्हाळे गोविंद मोर भूपेंद्र परिहार अभिजीत डोंगरे. ईश्वर पिसे योगेश तिखीले आदी मान्यवर उपस्थित होते.