ताज्या घडामोडी

जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलचा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत प्रथम क्रमांक 

 

 

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज

स्काय इंटरनॅशनल स्कूल मध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकविला.

प्रदूषण कसे कमी करावे या विषयावर मार्मिक पद्धतीने विद्यार्थ्यांनी कृती सादर केली व प्रदूषण कसे कमी करावे यावर उपायही सुचविला. त्यांच्या या कृतीचे सर्वांनी अत्यंत मनापासून कौतुक केले.

गटशिक्षणाधिकारी पोपेश्वर भोयर,विस्तार अधिकारी प्रणिता ताई गाढवे उपशिक्षणाधिकारी डॉ. नीताताई गावंडे यांच्या हस्ते ध्रुव तिपशेट्टवार आरव तंबाखे या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले.

विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष खासदार डॉ.विजयबाबू दर्डा सचिव कीर्ती गांधी यांनी मोठ्या प्रमाणात कौतुक केले. प्राचार्य मिनी थॉमस, उपप्राचार्य केशेट्टीवार यांनी विद्यार्थी तसेच त्यांचे मार्गदर्शक व सहाय्यक शिक्षक वंदना चक्करवार, अश्विनी थोटे, प्रफुल पांगुळ तसेच वर्गशिक्षिका सारिका भोयर यांचेही त्यांनी दिलेल्या अमूल्य मार्गदर्शनाबद्दल मनापासून अभिनंदन केले व प्रोत्साहन पर शुभेच्छा दिल्या.

आमच्या व्हाटसअप ग्रुप ला जॉइन व्हा
शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!