अत्यंत निस्वार्थ भावनेने रुग्णांसाठी रक्तदानापासून प्रत्येक क्षेत्रात काम करणारी संस्था म्हणून निस्वार्थ सेवा फाउंडेशन चे कार्य मोठे आहे…… सुरेश राठी

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
रक्तदान आणि आरोग्य विषयक संदर्भ सेवा गेल्या पाच वर्षापासून अविरतपणे देणाऱ्या यवतमाळातील नि:स्वार्थ सेवा फाऊंडेशनचा पाचवा वर्धापन दिन नुकताच उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना सुरेश भाऊ राठी यांनी नि:स्वार्थ सेवा फाऊंडेशन बद्दल गौरवोद्गार काढले. ते पुढे म्हणाले की अशाप्रकारे काम करणारी तरुणांची संस्था हे यवतमाळचे भूषण आहे.
आपला व्यवसाय, आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळून अतिशय कमी वयात नि:स्वार्थ च्या कार्यकर्त्यांनी सामाजिक सेवेचा अंगीकार केला या सेवेचा आदर्श आपणही सगळ्यांनी घेतला पाहिजे.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.विजय कावलकर, रेमंडचे श्री. संतोष चांडक, पत्रकार विजय बुंदेला, अनंत कौलगीकर, प्रशांत बनगिनवार प्रा. घनश्याम दरणे सुद्धा उपस्थित होते.
याप्रसंगी विविध सामाजिक संस्था आणि व्यक्तींचा सामाजिक कार्यातील सहभागाबद्दल भावपूर्ण सत्कार करण्यात आला. करोना काळापासून अविरत सेवेसाठी धैर्य वेल्फेअर फाउंडेशनचे कमलेश बघेल, बस स्थानकाचा परिसर स्वतःहून स्वच्छ करणारे महादेवराव काचोरे,रक्तदान चळवळीत कार्य करणारी महाविर प्रिमियम लीग चे अंशुल तातेड व मित्र परिवार, रक्तदानाची चळवळ यवतमाळ रुजवणारे श्री.शैलेश करीहार, सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालय, विद्या भवन महाविद्यालय, आर्णी येथील स्व. सुशिलाबाई नागपूरे वृद्धाश्रमाचे खुशाल नागपुरे, रुग्णसेवक रवी ठाकूर, रेमंड डेनिम लिमिटेड, तसेच गौसेवे सोबतच मुकजनावरासाठी अहोरात्र झटणारी बि-काइंड फाऊंडेशन व युनिटी फाऊंडेशन चा समावेश होता.
याप्रसंगी मान्यवरांनी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देत भावी काळात संस्थेचा कार्य विस्तार व्हावा असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचलन परशुराम कडू, किरण हेडाऊ, प्रार्थना राऊत, अर्पित शेरेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिकेत नवरे, चेतना राऊत, सुजाता गेडाम, कल्पना मालगन, अरुणा चव्हाण , चेतन पखाले, आस्तेश गावंडे, ईश्वर येरके, मयुरे काळे, करण गेडाम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला यवतमाळतील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.