MIT विद्यापीठाचा ‘स्टार्टअप ऑफ द इयर’ पुरस्कार Gyrodrive Machineries Pvt. Ltd. ला – यवतमाळसाठी गौरवाचा क्षण!

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
यवतमाळच्या औद्योगिक क्षेत्रासाठी आणि नवसंशोधनासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे! अत्याधुनिक तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण संशोधन आणि उत्कृष्टतेच्या बळावर यशस्वी वाटचाल करणाऱ्या Gyrodrive Machineries Pvt. Ltd. या कंपनीला प्रतिष्ठित MIT विद्यापीठाच्या ‘स्टार्टअप ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे
Gyrodrive Machineries Pvt. Ltd. चे संचालक आकाश सुर्यकांत गड्डमवार हे या यशामागील प्रमुख प्रेरणास्थान आहेत यवतमाळसारख्या ठिकाणी राहूनही त्यांनी जागतिक दर्जाचे औद्योगिक उत्पादन निर्माण करण्याचा ध्यास घेतला. त्यांची दूरदृष्टी, नेतृत्वगुण आणि औद्योगिक कौशल्यामुळे कंपनीला सतत नवीन उंचीवर पोहोचवले जात आहे.
यवतमाळसाठी अभिमानाचा क्षण!
हा पुरस्कार केवळ Gyrodrive Machineries Pvt. Ltd. च्या टीमसाठीच नाही, तर संपूर्ण यवतमाळ आणि विदर्भासाठीही हा अभिमानाचा क्षण आहे. यामुळे स्थानिक पातळीवरून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्याच्या दृष्टीने नवा मार्ग मोकळा झाला आहे. हा सन्मान यवतमाळच्या तरुण उद्योजकांना नवीन संधी निर्माण करण्यासाठी प्रेरणा देणारा ठरेल