ताज्या घडामोडी

५ जानेवारी ला सर्वशाखीय तेली समाजाचा राज्यस्तरीय उप वधू-वर मुला-मुलींच्या परिचय मेळाव्याचे आयोजन

 

 

 

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज

तेली समाज विवाह व सांस्कृतिक मंडळ, यवतमाळ च्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यवतमाळ येथील श्री संताजी मंदिर, संकट मोचन रोड, यवतमाळ च्या प्रांगणामध्ये सर्व शाखीय तेली समाजाचा उप वधू- वर मुला-मुलींचा राज्य स्तरीय परिचय मेळावा दि. ५ जानेवारी २०२५ ला आयोजीत केला आहे.

यंदाचा हा ३७ वा परिचय मेळावा असुन या मेळाव्याचे उ‌द्घाटक म्हणून मा.बाळासाहेब मांगुळकर, आमदार यवतमाळ हे राहणार आहेत. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.महेश रामभाऊजी ढोले, अध्यक्ष, तेली समाज विवाह सांस्कृतिक मंडळ, यवतमाळ हे राहणार असुन, मुख्य अतिथी म्हणून मा.विजय वडेट्टीवार, आमदार, ब्रम्हपूरी, मा.संध्याताई सव्वालाखे, अध्यक्षा म. प्र. महिला काँग्रेस कमिटी, मा.रामदासजी तडस, माजी खासदार, मा.सर्वेश चाफळे, सहाय्यक संचालक नगर रचना, यवतमाळ (नाशिक), प्रमुख अतिथी मा. सुरेश वाघमारे, माजी खासदार, मा.संतोषभाऊ ढवळे, जिल्हा अध्यक्ष, शिवसेना यवतमाळ, मा.शैलेश गुल्हाने, अध्यक्ष, श्री.संताजी शिक्षण प्रसारक मंडळ, यवतमाळ, मा. संजय हिंगासपूरे, अमरावती, मा.संजय जिरापूरे, अकोला, मा.प्रभाकर सव्वालाखे, नागपूर, मा.दिपक गिरोळकर, अमरावती, मा. महादेवराव गुल्हाने, अकोला इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तेली समाजाचा हा सर्वशाखीय राज्यस्तरीय उप वर-वधु मेळावा असुन मंडळाच्या सदस्यांनी गेल्या २ महिन्यापासून ठिक ठिकाणी फिरून उए-वधु चे एकुण ४५० परिचय पत्र एकत्रित करून “शुभमंगलम् पुस्तिका” तयार केली. या प्रसंगी या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

आमच्या व्हाटसअप ग्रुप ला जॉइन व्हा

समाजाच्या दृष्टिने हा मेळावा आयोजीत करून सुयोग्य जोडीदार मिळावा या करिता मंडळाचे प्रयत्न असुन याचा लाभ उप-वर मुला-मुलींनी घ्यावा. या मेळाव्यास हजारो समाज बांधव उपस्थित राहील या दृष्टीने मंडळाने नियोजन केले असुन संताजी मंडळाचे प्रांगणात मोठा मंच तयार करण्यात आला आहे. व त्यामध्ये उप- वर वधु यांना बसण्याची विशेष व्यवस्था केली आहे.

सर्व समाज बांधवांनी, उपवर मुला-मुलींनी व पालकांनी या भव्य परिचय मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे सर्वश्री देविदासजी देऊळकर, रामकृष्णजी पजगाडे, सुरेश अजमिरे, विद्याताई पोलादे, अशोक जयसिंगपूरे, प्रकाश मुडे, दामोधर मोगरकर, मनोहरराव गुल्हाने, सुरेशराव जयसिंगपूरे, राजेश चिंचोरे, जितेंद्र हिंगासपूरे, दिवाकर किन्हीकर, उत्तम गुल्हाने, आर.आर. शिरभाते, मुकुंदराव पोलादे, नंदकिशोर जिरापूरे, शिवदास गुल्हाने, किशोर गुल्हाने, रश्मीताई गुल्हाने, रामभाऊ ढाले, संजय अंबाडेकर, बाळासाहेब शिंदे, अभिजीत शिंदे, अजाबराव तंबाखे , केदार शिरे आदिंनी केले आहे.

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!