*कु. योगिता भवरीलाल बोरा यांना आचार्य (Ph.D.)पदवी

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
कु. योगिता बी. बोरा यांनी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (Ph.D.) पदवी संपादन केली आहे. “AN ANALYTICAL STUDY OF TRADEMARKS IN THE LIGHT OF EMERGING CONCEPTS OF DOMAIN NAME DISPUTES AND CYBER SQUATTING” या विषयावर त्यांनी आपला प्रबंध यशस्वीरीत्या सादर केला. कु. बोरा स्वातंत्र्यसैनिक जवाहरलाल दर्डा लॉ कॉलेज, यवतमाळ या महाविद्यालया च्या संशोधक असून मागील बरेच वर्षापासुन येथे विधी अध्यापना चे कार्य करीत आहेत
या यशात त्यांना संशोधन मार्गदर्शक व महाविद्यालयाचे प्राचार्य *डॉ. विजेश मुनोत* यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल विद्या प्रसारक मंडळाचे *अध्यक्ष डॉ. विजय दर्डा, उपाध्यक्ष डॉ. ललित निमोदिया, अधिवक्ता प्रविण जानी, सचिव सीए प्रकाश चोपडा* यांनी कु. योगिता बी. बोरा यांचे व प्राचार्य डॉ. विजेश मुनोत चे विशेष अभिनंदन केले असून, महाविद्यालयाच्या वतीने व विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने त्यांच्या पुढील संशोधन आणि शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
या यशाचे श्रेय कु. बोरा यांच्या वडील *भंवरीलाल बोरा, आई शोभा बोरा,* कुटुंबीय, व्यवस्थापन, मार्गदर्शक, सहकारी, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, हितचिंतकांना दिला आहे.