पोस्टल ग्राऊंड येथे जैन बिझनेस कार्निवलचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांचे शुभहस्ते उद्या उदघाट्न

यवतमाळकॉटन सिटी न्यूज
जोश फाऊंडेशन ही यवतमाळ शहरातील, सामाजिक क्षेत्रात काम करणारी अग्रगण्य अशी सामाजीक संस्था आहे. या संस्थेच्या वतीने दरवर्षी जैन बिझनेस कार्निवलचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी हे आयोजन 10 ते 13जानेवारी ला समता मैदान (पोस्टल ग्राऊंड) येथे केल्या जात आहे.10 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता उद्घाटन सोहळा माननीय जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या शुभहस्ते पोलीस निरीक्षक सतीश चावरे. बाराशे स्टेशनचे अध्यक्ष एडवोकेट संजय सिसोदिया जनसेवा समितीचे अध्यक्ष डॉ. रमेश खिवसरा जैन श्वेतांबर मूर्ती पूजक श्री संघाचे अध्यक्ष सुभाष जैन आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी दि. 10 ते 13 जानेवारी दरम्यान आयोजीत होणा-या या जैन बिझनेस कार्निवलचा समस्त यवतमाळ करानी लाभ घ्यावा असे आव्हान जोश फाउंडेशन यवतमाळ ने केले आहे