‘इनरव्हील क्लब तर्फे बचत से संपत्ती तक : महिलाओ के लिये बचत के अवसर ‘ या विषयावर कार्यशाळेचे सफल आयोजन

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
इनर व्हील क्लब ऑफ यवतमाळ व HDFC mutual funds यांच्या वतीने ‘बचत से संपत्ती तक : महिलाओ के लिये बचत के अवसर ‘ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये बचतीचे विविध मार्ग, त्याची उपयोगिता, फायनान्सियल प्लॅनिंग मध्ये महिलांचे योगदान, नियोजन कसे करायचे या बद्दल माहिती HDFC mutual funds che chif manager श्री अजय सिंग राजपूत ह्यांनी दिली. तसेच आजकाल होत असलेल्या फायनान्सियल फ्रॉड पासून स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे याचे मार्गदर्शन श्री विजयजी शेटे ह्यांनी दिले. या १ तासाच्या कार्यशाळेला इनर व्हील क्लब च्या अध्यक्षा प्रांजली ढुमे व पदाधिकारी हेमा छेडा, डॉ वृषाली माने, अमृता येरावार, डॉ माणिक मेहेरे, रुचा गढीकर, दीपा गुघाणे सोनाली शिंदे, सुनीता नथीले, नीलू मुंधडा, सुवर्णा ठाकरे, नीलिमा मांगूळकर, डॉ विद्या पाचकवडे, रश्मी पारटकर उपस्थित होत्या.तसेच यवतमाळातील महिलांनी सहभाग नोंदविला.